चारित्र्यवर संशय घेऊन पतीने केले पत्नीच्या गळ्यावर वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 18:52 IST2021-08-23T18:52:19+5:302021-08-23T18:52:26+5:30
Crime News : ही घटना तालुक्यातील चिखला येथे २२ ऑगस्टच्या रात्री ११ वाजता घडली.

चारित्र्यवर संशय घेऊन पतीने केले पत्नीच्या गळ्यावर वार
बुलडाणा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या गळ्यावर कटरने वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना तालुक्यातील चिखला येथे २२ ऑगस्टच्या रात्री ११ वाजता घडली. २३ ऑगस्ट रोजी याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
ढालसावंगी येथील उषा संदीप बोरकर(२७) ही माहेरी चिखला येथे आली होती. २२ ऑगस्ट रोजी रात्री तिचा पती संदीप सखाराम बोरकर (३५) सुद्धा सासरवाडीत आला. रात्री ११ च्या सुमारास दोघा पती-पत्नीत वाद झाला. पती सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून वाद सुरू होताच. संदीपने उषाच्या गळ्यावर कटरने सपासप वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. माहेरच्या लोकांनी तिला लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी विवाहितेचा भाऊ सुनील संदीप गायकवाड (२०, रा. चिखला) याने याप्रकरणाची तक्रार बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून तिचा पती संदीप सखाराम बोरकर याच्याविरुद्ध सोमवारी पहाटे ग्रामई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.