खामगाव बाजार समितीच्या आठ व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:38 IST2019-03-31T15:38:47+5:302019-03-31T15:38:57+5:30
खामगाव: शेतमालाची नियमबाह्य पध्दतीने उलटी हर्रासी केल्याप्रकरणी बाजार समितीने आठ व्यापाऱ्यांचे परवाने पाच दिवसांसाठी निलंबित केले आहेत.

खामगाव बाजार समितीच्या आठ व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शेतमालाची नियमबाह्य पध्दतीने उलटी हर्रासी केल्याप्रकरणी बाजार समितीने आठ व्यापाऱ्यांचे परवाने पाच दिवसांसाठी निलंबित केले आहेत.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३ मार्च रोजी शेतमालाची उलट्या पध्दतीने हर्राशी केली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. याचे स्टिंग आॅपरेशन ‘लोकमत’ने केले होते. त्याची दखल घेत तीन तासात जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी बाजार समिती प्रशासनाला संबंधीत प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. लोकमत फेसबूक लाईव्हची लिंक सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी कृउबासने ३ अडते व ६ खरीददार व्यापारी अशा ९ जणांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या.
दरम्यान, या प्रकरणी दोषी आढळलेल्या ८ व्यापाऱ्यांवर बाजार समितीने परवाने निलंबनाची कारवाई केली आहे. याप्रकरणी मोहता नवनीत एन्टरप्राईजेस, प्रमोद प्रेमसुखदास चांडक, हर्षद ट्रेडींग कंपनी, सुनील रामपाल खंडेलवाल गिरीष इंडस्ट्रीज, श्रेष्ठकुमार कृष्णकुमार भाटीया, चोपडा कॉर्पोरेशन व घनश्यामदास नारायणदास गांधी यांचे परवाने आजपासून ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती कृउबास सचिव जाधव यांनी दिली. या कारवाईने कृउबास वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)