शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

खासगी रुग्णालयात युवकाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी नोंदविले तीन डॉक्टरांचे जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 4:17 PM

खामगाव: शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील एका ३७ वर्षीय युवकाच्या खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू प्रकरणी बुधवारी शहर पोलिसांनी तीन डॉक्टरांचे जबाब नोंदविले.

ठळक मुद्देअडीच महिन्यांपूर्वी अपघातामुळे रॉड टाकलेल्या हाताची परत तपासणी असल्याने, उमेश शेगोकार एकटेच रूग्णालयात होते.भरती करण्यात आल्यानंतर काही वेळातच ३० जून रोजी उमेश शेगोकार यांचा एका मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी शंका उपस्थित केली.रेनबो हॉस्पीटलचे डॉ. दुसाद,  डॉ. मनिष अग्रवाल आणि भूलतज्ज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांचे जबाब शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष टाले यांनी नोंदविले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील एका ३७ वर्षीय युवकाच्या खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू प्रकरणी बुधवारी शहर पोलिसांनी तीन डॉक्टरांचे जबाब नोंदविले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

माटरगाव येथील उमेश निवृत्ती शेगोकार (३७) यांचा हात दुखत असल्याने खामगाव शहरातील डॉ. दुसाद यांची भेट घेतली.  काही महिन्यांपूर्वी अपघातामुळे दुखापत झालेल्या रॉड टाकलेल्या हातावर किरकोळ शस्त्रक्रीया केल्यानंतर हात दुखणार नाही, तसेच ही शस्त्रक्रीया अतिशय किरकोळ असल्यामुळे नातेवाईकांची सोबत असण्याची गरज नसल्याचे डॉ. दुसाद यांनी सांगितले. शिवाय या शस्त्रक्रीयेसाठी दोन-तीन हजार रूपये खर्च येणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे उमेश शेगोकार यांना डॉ. दुसाद यांच्या खासगी दवाखान्यात भरती केल्यानंतर त्यांचे वडील डबा आणण्यासाठी घरी निघून गेले. अडीच महिन्यांपूर्वी अपघातामुळे रॉड टाकलेल्या हाताची परत तपासणी असल्याने, उमेश शेगोकार एकटेच रूग्णालयात होते. दरम्यान, भरती करण्यात आल्यानंतर काही वेळातच ३० जून रोजी उमेश शेगोकार यांचा एका मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी शंका उपस्थित केली. त्यामुळे शेगोकार यांचे इन कॅमेरा शवविच्छेदन केले. दरम्यान, याप्रकरणी रेनबो हॉस्पीटलचे डॉ. दुसाद,  डॉ. मनिष अग्रवाल आणि भूलतज्ज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांचे जबाब शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष टाले यांनी नोंदविले. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

दुसाद यांनी उपचारानंतर केले होते दुसºया दवाखान्यात भरती!

उमेश शेगोकार यांना डॉ. दुसाद यांच्या मालकीच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, याठिकाणी शेगोकार यांची प्रकृती खालावल्यामुळे शेगोकार यांच्या वडिलांसह नातेवाईकांची परवानगी न घेताच  एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. यावरून नातेवाईकांना डॉ. दुसाद यांच्या प्रामाणिकतेबद्दल शंका उपस्थित झाल्याने, वाद उद्भवला होता. डॉ. दुसाद यांच्या भूमिकेवर संशय आल्याने मृतक उमेशचे वडील निवृत्ती शेगोकार यांनी खामगाव शहर पोलिसात रात्रीच तक्रार नोंदविली होती. त्यानंतर मृतक उमेशचे अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

 

शव विच्छेदनाचा अहवाल ‘राखीव’!

मृतक उमेश शेगोकार यांच्या पार्थीवावर अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप राखीव ठेवण्यात आला असून, त्यांच्या शरीरातील ७ नमूने काढण्यात आले. यापैकी चार नमुने अमरावती येथील तर तीन नमुने अकोला येथील प्रयोग शाळेत ठेवण्यात आल्याची माहिती आहे. 

 

 

उमेश शेगोकार संशयास्पद मृत्यू प्रकरणी तीन डॉक्टरांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल अद्याप राखीव असून, विस्तृत शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल. पोलिस तपासात आणखी काही निष्पन्न होते का? यादृष्टीकोनातून तपास सुरू आहे.

- संतोष टाले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिसdoctorडॉक्टर