Suman Chandra is the Buldhana new district collector | सुमन चंद्रा बुलडाण्याच्या नव्या जिल्हाधिकारी

सुमन चंद्रा बुलडाण्याच्या नव्या जिल्हाधिकारी

बुलडाणा: दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये सहाय्यक आयुक्त असलेल्या सुमन चंद्रा यांची बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी म्हणून सहा डिसेंबर रोजी बदली झाली. महाराष्ट्र कॅडरच्या तीन अधिकाऱ्यांची बदली झाली असून, त्यात चंद्रा यांचाही समावेश आहे. यापूर्वी महाराष्ट्रात काम करण्याचा अनुभव सुमन चंद्रा यांना आहे. त्याअनुषंगाने त्यांची ही बदली झाली आहे. दरम्यान, प्रत्यक्षात त्या कधी पदभार स्वीकारणार आहेत, ही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र त्यांची बुलडाणा येथे बदली झाल्याचे अधिकृत वृत्त आहे.

बुलडाणा येथील जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे या कार्मिक शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्त ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथे पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास करण्यासाठी सुमारे दोन महिन्यांसाठी गेल्या आहेत. त्यामुळे बुलडाणा येथील जिल्हाधिकारी पद रिक्त झाले होते. त्या जागी सुमन चंद्रा यांची बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही त्यांना काम करण्याचा अनुभव आहे.

तूर्तास बुलडाणा जिल्हाधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्याकडे पदभार आहे. महाराष्ट्र कॅडरच्याच सुमन चंद्रा या आयएएस अधिकारी असून, प्रत्यक्षात बुलडाणा येथील पदभार त्या कधी स्वीकारतात याबाबत आता उत्सुकता लागली आहे. २०१० च्या आयएएस बॅचच्या त्या अधिकारी आहेत.
 

Web Title: Suman Chandra is the Buldhana new district collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.