घरातून निघून गेलेल्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 16:49 IST2019-12-01T16:48:54+5:302019-12-01T16:49:04+5:30

सिद्धार्थ वसंता गव्हांदे रविवारी रोजी पहाटे साडे सहा वाजताच्या दरम्यान कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेला.

Suicide of a youth leaving home | घरातून निघून गेलेल्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

घरातून निघून गेलेल्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

संग्रामपूर: अचानक घरातून निघून गेलेल्या एका युवकाने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. 
संग्रामपूर तालुक्यातील वकाना येथील 35 वर्षीय युवक सिद्धार्थ वसंता गव्हांदे रविवारी रोजी पहाटे साडे सहा वाजताच्या दरम्यान कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेला. नातेवाईकांनी गावात विचारपूस करून शोध घेतला. मात्र सिद्धार्थ चा शोध लागेना. सकाळी दहा वाजताच्या दरम्यान नातेवाईक व गावकऱ्यांनी शेतात शोध घेतला. तेव्हा शेतामध्ये निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. यासंदर्भात तामगाव पोलिस स्टेशनला गौतम शहादेव गव्हांदे यांनी फिर्याद दिली. यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तामगाव पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Suicide of a youth leaving home