इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: June 1, 2014 23:48 IST2014-06-01T23:38:25+5:302014-06-01T23:48:05+5:30
चिखली तालुक्यातील ५१ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या.

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
मेहकर : चिखली तालुक्यातील आमखेड येथील ५१ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, आमखेड येथील ज्ञानेश्वर भीमराव नातेकर (५१) हा गावातीलच लक्ष्मण वाघ यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घे तलेला आज सकाळी आढळून आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.