शेतमजुराची फाशी घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: June 11, 2016 02:49 IST2016-06-11T02:49:26+5:302016-06-11T02:49:26+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; कुटुंब पडले उघड्यावर.

Suicide with taking the death penalty | शेतमजुराची फाशी घेऊन आत्महत्या

शेतमजुराची फाशी घेऊन आत्महत्या

सुनगाव (जि. बुलडाणा): येथील शेतमजूर मधुकर धोंडुजी धुळे (४५) यांनी १0 जूनला सकाळी गुरांच्या गोठय़ात लाकडी ठुणीला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतकाचा भाऊ किसन धोंडुजी धुळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत. मजुरीशिवाय उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे मधुकर धुळे यांच्या पश्‍चात कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलगा आहे.

Web Title: Suicide with taking the death penalty