शेतकरी आणि युवकाची आत्महत्या, बुलढाणा जिल्ह्यातील घटना
By विवेक चांदुरकर | Updated: December 17, 2023 20:12 IST2023-12-17T20:11:27+5:302023-12-17T20:12:01+5:30
सुबोध रामराव थोरबोले यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

फोटो - शेतकरी थोरबोले
वडनेर भोलजी-नरवेल - वडनेर भाेलजी येथून जवळच असलेल्या मोमिनाबाद येथील शेतकरी सुबोध रामराव थोरबोले (वय ४५) यांने १६ डिसेबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान शेतात ठिबक नळीच्या साह्याने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तसेच येथे एका २२ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १७ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली.
सुबोध रामराव थोरबोले यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास चांदुरबिस्वा पोलीस चौकीचे राजु चौधरी, तडवी करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा आहे. या संदर्भात पोलीसांनी आस्कमित मृत्यूची नोंद केली आहे.
नरवेल येथील फिर्यादी तुषार मनोहर बराटे (वय ३८) यांनी दसरखेड एमआयडीसी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीनुसार, नरवेल येथील रहिवासी वृषभ दिगंबर बराटे (वय २२) याने स्वतः च्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तक्रारीवरून कलम १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार हेमराज कोळी यांच्या आदेशाने बीड जमादार बावणे करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.