कर्जाला कंटाळून सुलतानपूर येथील युवकाची आत्महत्या
By संदीप वानखेडे | Updated: March 17, 2024 19:09 IST2024-03-17T19:09:31+5:302024-03-17T19:09:40+5:30
प्रकाश प्रभाकर नरवाडे असे मृतकाचे नाव आहे.

कर्जाला कंटाळून सुलतानपूर येथील युवकाची आत्महत्या
सुलतानपूर: वाढत्या कर्जाच्या डाेंगराला कंटाळून ३३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ मार्च राेजी सुलतानपूर येथे घडली. प्रकाश प्रभाकर नरवाडे असे मृतकाचे नाव आहे. सुलतानपूर येथील प्रकाश प्रभाकर नरवाडे हे १७ मार्चच्या सकाळी बाहेरून येतो असे घरातील लोकांना सांगून निघून गेले हाेते. बराच वेळ झाला तरी घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला असता एका शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेला आढळले.
ते घरातील कर्ते हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली , वृद्ध आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने घरातील कर्ताच गेल्याने गरीब परिस्थितील हे कुटूंब अक्षरशः खचले आहे. मृतक प्रकाश यांच्यावर लोकांचे देणे असल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. याप्रकरणी मृतकाचा भाऊ संतोष प्रभाकर नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. पुढील तपास बीट जमादार लक्ष्मण कटक व पोकॉ. राजू जाधव करीत आहेत.