७५ वर्षीय वृद्धेची पेटवून घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 01:02 IST2017-04-06T01:02:56+5:302017-04-06T01:02:56+5:30
मोताळा : तालुक्यातील रोहिणखेड येथील ७५ वर्षीय वृद्धेने अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ एप्रिलला घडली.

७५ वर्षीय वृद्धेची पेटवून घेऊन आत्महत्या
मोताळा : तालुक्यातील रोहिणखेड येथील ७५ वर्षीय वृद्धेने अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ एप्रिलला घडली. या घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच रमेशसेठ येंडोले यांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला पाचारण केले.
कमलबाई मधुकर बोंद्रे (आप्पा) या जळालेल्या वृद्ध महिलेस पुढील उपचारार्थ बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा सायंकाळी ७ वाजेदरम्यान मृत्यू झाला. वृद्धेची मानसिक स्थिती ठिक नसल्याने अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेतल्याची चर्चा परिसरात आहे. मृतक महिलेच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.