शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:21 IST2020-04-15T11:21:23+5:302020-04-15T11:21:29+5:30

बाळकृष्ण कोकाटे हे शेतमजुरी करीत असून त्यावरच आपला उदरनिर्वाह चालवत होते.  

Suicide by farm labor | शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या 

शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या 

एकलारा बानोदा: संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा येथील बाळकृष्ण कोकाटे या शेतमजूराने मंगळवारी रात्री गावाजवळील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 
बाळकृष्ण कोकाटे हे शेतमजुरी करीत असून त्यावरच आपला उदरनिर्वाह चालवत होते.  ते घरातले प्रमुख असल्याने सगळ्या घराचा भार त्यांच्यावर होता. मंगळवारी रात्री अचानक ते घरातून बाहेर निघून गेले. बुधवारी सकाळी कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते दिसून आले नाही. काही वेळाने नागरिकांनी गावाच्या परिसरात त्यांचा शोध घेतला असता ते चिंचेच्या झाडाला लटकलेले दिसून आले.  याबाबत पोलिस पाटलांनी तामगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Suicide by farm labor