सुतगिरणी कामगारांचा मोर्चा

By Admin | Updated: December 6, 2015 02:32 IST2015-12-06T02:32:13+5:302015-12-06T02:32:13+5:30

प्रशासनाविरोधात रोष ; मुला-बाळांसह घेतला सहभाग.

Sugargirani Workers' Front | सुतगिरणी कामगारांचा मोर्चा

सुतगिरणी कामगारांचा मोर्चा

मलकापूर : वारंवार निवेदने, धरणे, उपोषण व आंदोलने करुनही गतवर्षभरापासून बंद असलेली वीर जगदेवराव सह. सुतगिरणी सुरु न करण्यात आल्याने ५ डिसेंबर रोजी कामगारांच्यावतीने प्रलंबीत मागण्यासाठी मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. दुपारी एक वाजता निघालेल्या या मोर्चात मोठय़ा संख्येने कामगार सहभागी झाले होते. महिलांची संख्या यात मोठी होती. लाडु-चॉकलेट देणे बंद करा, सुतगिरणी प्रशासनाचा जाहीर निषेध, असे असे फलक घेऊन शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघाला होता. माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात लॉयन्स क्लब येथून मोर्चा निघाला होता. मोर्चात सहभागी कामगारांनी सुतगिरणी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत बंद असलेली सुतगिरणी तात्काळ सुरु करुन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करीत एसडीओंच्या अनुपस्थितीत तहसिलदार रविंद्र जोगी यांना शिष्ट मंडळाने हे निवेदन दिले. दरम्यान प्रशासकीयस्तरावर सवरेतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे आश्‍वासन तहसीलदारांनी मोर्चेकर्‍यांना यावेळी दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख सह अँड. हरिश रावळ, सोपानराव शेलकर, राजू पाटील, सुनील बगाडे, राजू वाडेकर, अँड. जावेद कुरेशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, एस. पी. संबारे, ढगे, विठ्ठल गावंडे, नवृत्ती पाटील, जुबेर खान कामगार युनियनचे पुंडलिक तायडे, गजानन बोंडे, कैलास राजपूत, अमृत संबारे, भागवत संबारे, सतिश संबारे, ज्ञानेश्‍वर विनकरे, सुभाष गायकवाड, मनोहर काळे, आशाताई काळे, ललिता न्हावी, संजय सातव, शांताराम आमले, ज्योतीताई जाधव हे कामगार सहभागी झाले होते.

Web Title: Sugargirani Workers' Front