शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

सुबोध सावजींनी आरोग्य प्रशासनाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 6:44 PM

बुलडाणा : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील सहा आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असल्याच्या मुद्द्यावरुन माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ५ मे रोजी आरोग्य प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्दे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली.सहा आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती एका वर्षापेक्षा जास्त काळापासून बंद असल्याचे वास्तव समोर आले.शनिवारी सावजी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची भेट घेतली,या सहा आरोग्य उपकेंद्रांबद्दल त्यांना जाब विचारला.

बुलडाणा : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील सहा आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असल्याच्या मुद्द्यावरुन माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ५ मे रोजी आरोग्य प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. याप्रकरणी चौकशीचे आदेश निर्गमित करण्यासह १५ दिवसांच्या आत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आरोग्य अधिकाºयांच्या कक्षात मांडलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.  बुलडाणा जिल्ह्यात २८० आरोग्य उपकेंद्र आहेत. या उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील गोरगरिब रुग्णांवर औषधोपचार करण्यात येतात. शासनाचा दरवर्षी लाखो रुपयांचा निधी या उपकेंद्रांवर खर्च होतो. मात्र तरीही रुग्णांना योग्य औषधोपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना गैरसोय सहन करावी लागते. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. तेव्हा अनेक गंभीर बाबी समोर आल्या. जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा, झाडेगाव, आडोळ, लोणार तालुक्यातील अजिसपूर, चोरपांग्रा व संग्रामपूर तालुक्यातील कळमखेड आदी सहा आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती एका वर्षापेक्षा जास्त काळापासून बंद असल्याचे वास्तव समोर आले. शनिवारी सावजी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची भेट घेतली. बंद असलेल्या या सहा आरोग्य उपकेंद्रांबद्दल त्यांना जाब विचारला. मात्र त्यांना याविषयी काहीच माहित नसल्याची बाब  समोर आली. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय कक्षातून हलणार नसल्याची भूमिका सावजी यांनी घेतली. दरम्यान संबंधित वैद्यकिय अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन सुबोध सावजी यांच्या समक्ष चौकशी करण्याचे आदेश निर्गमित करण्यात येतील. ही कारवाई १५ दिवसात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन डॉ. पवार यांनी दिले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSubodh Savjiसुबोध सावजी