उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 14:00 IST2018-10-13T14:00:06+5:302018-10-13T14:00:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोणताही सुगावा नसताना किचकट गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांना ...

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील सन्मानित
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोणताही सुगावा नसताना किचकट गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांना सन्मानित करण्यात आले. अमरावती विभागाचे पोलिस महानिरिक्षक श्रीकांत तरवडे यांनी पाटील यांचा शनिवारी बुलडाणा येथे एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला. किचकट गुन्ह्याच्या तपासात एसडीपीओ पाटील यांना दुसºयांदा सन्मानित करण्यात आले, हे येथे उल्लेखनिय! शेगाव तालुक्यातील जलंब पोलिस स्टेशनतंर्गत नोव्हेंबर २०१७ मध्ये घडलेल्या एका गुन्ह्याचा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील आणि त्यांच्या पथकाने अवघ्या चार तासाच्या आत छडा लावला होता. स्विफ्ट डिझायर कारच्या हव्यासापायी आरोपीने एका चालकाचे अपहरण केले. या वाहनाची चाबी न दिल्याने अपहरण कर्त्याने चालकाचा करून खून केला होता. त्यानंतर प्रदीप पाटील यांनी वेगाने चक्रे फिरवित आरोपीला शिताफीने अटक केली होती. या उल्लेखनिय कामगिरीबद्दल पोलिस महानिरिक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ यांनी दहा हजाराचा पुरस्कार देवून प्रदीप पाटील यांचा गौरव केला.