शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

औषधनिर्माण शास्त्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 20:02 IST

फार्मसीच्या प्रवेशाला १७ जूनची ह्यडेडलाईनह्ण: आॅनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ

ब्रम्हानंद जाधव/ बुलडाणा राज्यातील सरकारी व विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील बी. फार्मसी व डी.फार्मसी प्रथम वर्ष २०१७-१८ च्या अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतीम मुदत १७ जून असून  औषधनिर्माण शास्त्राच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे.उच्च माध्यमिक शिक्षणाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया बारावीच्या निकालाच्या गुणपत्रिका (हार्ड कॉपी) मिळाल्यानंतरच सुरू होतात. बारावीचा निकाल ३० मे रोजी विद्यार्थ्यांच्या हातात पडताच विज्ञान, कला आणि वाणिज्य या पारंपरिक विद्याशाखांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष प्रवेशाचे वेध लागले. निकालानंतर दुसऱ्याच आठवड्यापासून विविध विद्याशाखांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी महाविद्यालयांनीही तयारी पूर्ण केली असून, अनेक महाविद्यालये यंदा आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवित आहेत. बारावी विज्ञानशाखेनंतर औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमामध्येही दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये डी.फार्मसी हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम असून औषध उत्पादन, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण, विक्री व विपणन, हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी यामध्ये करिअर करता येऊ शकते. त्यानंतर बी.फार्मसी ही पदवी घेता येते. राज्यातील सरकारी व विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील बी. फार्मसी व डी.फार्मसी प्रथम वर्ष २०१७-१८ च्या अभ्यासक्रमासाठी ६ जूनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. औषधनिर्माण शास्त्राच्या या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतीम मुदत १७ जून देण्यात आली असून, यावर्षी या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे.  आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या महाविद्यालयांकडून महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर सुद्धा अर्ज अपलोड केले जात आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जांप्रमाणे गुणवत्ता यादी तयार करून, त्यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत.

ग्रामीण भागातही पोहचले फार्मसीचे जाळेऔषधनिर्माण शास्त्र पदवी (बी फार्म) आणि औषधनिर्माण शास्त्र पदविका (डी फार्म) महाविद्यालयाचे ग्रामीण भागातही जाळे पसरले आहे. महाराष्ट्र शासनाने बी. फार्मसी आणि डी. फार्मसी महाविद्यालये सुरु करण्यासाठी अनेक ठिकाणी मान्यता दिली आहे. तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली आणि फार्मसी कौन्सिल आॅफ इंडिया या शिखर संस्थांची देखील राज्यातील काही औषध निर्माण शास्त्राच्या महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. मोठ्या संस्थांची मान्यता मिळत असल्याने  राज्यातील बी.फार्मसी व डी.फार्मसी महाविद्यालयांच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे.