दुस-या गणवेशापासून विद्यार्थी वंचित!

By Admin | Updated: December 7, 2015 02:23 IST2015-12-07T02:23:47+5:302015-12-07T02:23:47+5:30

दोन गणवेशापैकी एकच गणवेश मिळाल्याने पालकांमध्ये रोष

Students from the other uniform are deprived! | दुस-या गणवेशापासून विद्यार्थी वंचित!

दुस-या गणवेशापासून विद्यार्थी वंचित!

सुहास वाघमारे /नांदुरा (जि. बुलडाणा): नियमित गणवेश योजनेंतर्गत प्राथमिक शाळेतील मागासवर्गीय विद्या र्थ्यांंंंना देण्यात येणार्‍या गणवेशांच्या दोनपैकी पहिले सत्र संपेपर्यंंंंत एकच जोड मिळाला. यासंदर्भात पालकांकडून विचारणा होत असून, त्यांना तोंड देताना शाळा व्यवस्थापनाला रोषाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, याबाबत शासन उदासीन असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे.
जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांंंंना प्रत्येक वर्षी केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत दोनशे रुपये अनुदानाचा एक गणवेश व राज्य शासनाच्या निधीतून एक असे दोन गणवेश वितरित केले जातात. या नियमित गणवेश योजनें तर्गत प्रत्येक वर्षी राज्य शासनाचे अनुदान विलंबाने प्राप्त होत असल्याचे सांगितले जाते. यावर्षीही अद्याप अनुदान प्राप्त झालेले नसल्यामुळे मुख्याध्यापकांनी केंद्र शासनाच्या निधीतून फक्त एकाच गणवेशाचे वितरण केले आहे. आता प्रथम सत्र संपून द्वितीय सत्राला प्रारंभ झाला असून, यामुळे पालकवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्याध्यापकांना याबाबत पालकांनी विचारणा केल्यानंतर ते अनुदान प्राप्त होताच गणवेश वितरित केले जा तील, असे सांगतात. विशेष म्हणजे मागील वर्षाचे अनुदानही विलंबाने वितरित करण्यात आले होते. शासनाने याबाबत पूर्व नियोजन करून वेळेवर अनुदान देणे गरजेचे आहे. आज रोजी एकाच वर्गातील इतर विद्यार्थ्यांंंंना दोन व मागासवर्गीय विद्यार्थ्यांंंंना एक अशी गणवेश वितरणातील विषमता दिसून येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने नियमित गणवेश योजनेतील प्रलंबित अनुदान तत्काळ द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Students from the other uniform are deprived!