ऑनलाइन अभ्यासात विद्यार्थ्यांपुढे अडचणींचा पाढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:30 AM2020-04-26T11:30:56+5:302020-04-26T11:31:02+5:30

काही ठिकाणी विद्यार्थ्यांचा आॅनलाइन टेस्ट पेपर पालक, शिक्षक स्वत: च सोडवत आहेत.

Students face difficulties in online study! | ऑनलाइन अभ्यासात विद्यार्थ्यांपुढे अडचणींचा पाढा!

ऑनलाइन अभ्यासात विद्यार्थ्यांपुढे अडचणींचा पाढा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालयांकडून आॅनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. परंतू आॅनलाइन अभ्यासात अडचणींचाच पाढा अधिक वाचल्या जात आहे. अनेक पालकांकडे ‘अ‍ॅन्ड्रॉइड’ मोबाईल नसल्याने व्यत्यय येत आहे. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांचा आॅनलाइन टेस्ट पेपर पालक, शिक्षक स्वत: च सोडवत आहेत.
सद्या कोव्हिड-१९ (कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास थांबू नये, यासाठी आॅनलाईन अभ्यासाचा उपक्रम सर्वत्र सुरू आहे. अगदी जिल्हा परिषद शाळांपासून ते महाविद्यालय, उच्च माहविद्यालय स्तरावरही आॅनलाइन अध्यापन केले जात आहे. शिक्षकांकडून पालकांचे ग्रृप तयार करण्यात आले आहेत. त्यांना अभ्यासक्रमाच्या लिंक टाकून विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतल्या जातो. जिल्ह्या परिषदच्या विद्यार्थ्यांनाही अठवडा भराचा अभ्यास आॅनलाइन पूर्ण करून घेतला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून झालेल्या अभ्यासावर आॅनलाईन टेस्ट पेपर सोडविण्यात येते. त्याचा अहवाल शिक्षण विभागाकडके पाठविण्यात येतो. परंतू काही पालकांकडे व्हॉट्स अ‍ॅपची सुविधा आसलेले मोबाईल नसल्याने अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन अभ्यासाच्या अनेक अडचणी येतात. लींकवर क्लिककेल्यानंतर लिंकर उघडत नाही. इंटरनेटचाही खोडा निर्माण होतो. अशा परिस्थती काही शिक्षक स्वत: च विद्यार्थ्यांचा टेस्ट पेपर सोडवून मोकळे होतात.


आठवडा भराचा अभ्यास आॅनलाइन केल्यानंतर विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासावर टेस्ट दिल्या जात आहे. ती आॅनलाइन प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडूनच सोडवून घेणे आवश्यक आहे. अगदी मोजक्याच पालकांकडे असे मोबाईल नाहीत. त्यांनी दुसऱ्या मुलासोबत बसून तो अभ्यास पूर्ण करावा. एका ठिकाणी दोन मुले अभ्यास करू शकतात.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक), बुलडाणा.

 

Web Title: Students face difficulties in online study!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.