शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत माहिती देताना विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती नाही

By admin | Updated: July 31, 2015 00:34 IST

शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी शिक्षणाधिका-यांसह गटशिक्षणाधिका-यांना ‘व्हीसी’द्वारे दिले निर्देश.

खामगाव (जि. बुलडाणा) : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार ह्यसरलह्ण योजनेंतर्गत भरण्यात येणार्‍या ऑनलाइन माहितीसाठी शालेय विद्यार्थ्यांचा रक्तगट तसेच आधार क्रमांकाची माहिती देणे अनिवार्य नसल्याचे गुरुवारी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये स्पष्ट केले. ह्यसरलह्ण योजनेंतर्गत भरण्यात येणार्‍या ऑनलाइन माहितीमध्ये रक्तगट तसेच आधार क्रमांकाची माहिती देणे अनिवार्य असल्याचा अर्थ काढण्यात आला होता. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने सत समोर आणण्यासाठी शासननिर्णयातील तरतुदी प्रकाशित करताच रक्तगटाची माहिती सक्तीची नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. आता आधार कार्डचीही सक्ती नसल्याची बाब गुरुवारी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी स्पष्ट केली. जिल्ह्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त शाळा, त्या शाळेमध्ये कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ह्यसरलह्ण प्रणालीद्वारे ऑनलाइन भरण्याचे काम जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत सुरू आहे. या कार्यपद्धतीमुळे प्रत्येक संस्था, शिक्षक व विद्यार्थी यांची सर्व प्रकारची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. या अर्जामध्ये असलेल्या जवळपास ९0 रकान्यांपैकी केवळ १५ मुद्दय़ांचीच माहिती भरणे अपेक्षित आहे. ही सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या दाखल खारीज रजिस्टरमध्ये आधीच समाविष्ट असल्याने सहज उपलब्ध आहे. या माहितीसोबतच रक्तगट व आधार कार्डची माहिती सरल प्रक्रियेत विचारली आहे. त्यामुळे अनेक शाळांनी रक्तगट तपासणी व आधार कार्डची सक्ती करून विद्यार्थ्यांना किंवा पालकांना वेठीस धरले होते. रक्तगट लिहिणे ऐच्छिक असल्याचे समोर आल्यावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प समन्वयक शिंदे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांशी संवाद साधला. आधार कार्डची सक्ती नको, असल्यास माहिती भरा, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.