शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

विद्यार्थ्यांची ‘कृषी प्रयोगशाळा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:54 IST

 विवेकानंद कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विवेकानंद कृषी  महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थ्यांच्या  अभ्यासक्रमाशी निगडित असलेल्या सर्व पिकांची प्रयोगशाळाच दोन एकर  क्षेत्रामध्ये उभारली आहे. ‘कृषी प्रयोगशाळेत’ विद्यार्थी येऊन प्रत्यक्ष  अनुभवातून शिक्षण घेताना दिसून येत आहे.                

ठळक मुद्देविवेकानंद कृषी महाविद्यालयाचा उपक्रम विद्यार्थी घेतात प्रत्यक्ष  अनुभवातून शिक्षण

ओमप्रकाश देवकर । लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांना कृतीतून  जर शिकविले तर ते समजण्यास अधिक सोपे जाते, ही बाब हेरून  विवेकानंद कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विवेकानंद कृषी  महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थ्यांच्या  अभ्यासक्रमाशी निगडित असलेल्या सर्व पिकांची प्रयोगशाळाच दोन एकर  क्षेत्रामध्ये उभारली आहे. ‘कृषी प्रयोगशाळेत’ विद्यार्थी येऊन प्रत्यक्ष  अनुभवातून शिक्षण घेताना दिसून येत आहे.                                   कृषी शिक्षण म्हटले म्हणजे व्यापक अभ्यासक्रम आला. यामध्ये कृषीशी  निगडित सर्व यांत्रिकीकरण अवजारांचा, पिके, फळे, भाजीपाला, फुलशे ती यांची लागवड, खते, पाणी, कीड, रोग, काढणी, साठवणूक, विक्री या  बाबीचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो. सध्याची शिक्षण  पद्धती ही जलद असून, सहामाही सत्रात विभागल्या गेली आहे. यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांना अभ्यासक्रम आटोपता घ्यावा लागतो.  मुळात कृषीचा अभ्यासक्रम हा प्रात्यक्षिकावर अवलंबून आहे. पुस्तकात  वाचून परीक्षेची तयारी करता येते; मात्र प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक प्रत्यक्ष  केल्याशिवाय तो विषय परिपूर्ण समजत नाही. याच बाबीचा विचार करून  विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कालवे यांच्या  मार्गदर्शनात प्राध्यापकांनी प्रक्षेत्रावर रब्बीशी निगडित सर्व पिकांची पेरणी  विद्यार्थ्यांकडून करून घेतली. या रब्बीच्या प्रक्षेत्रावरील पीक पेरणी  कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, आश्रमाचे उपाध्यक्ष  अशोक थोरहाते, विश्‍वस्त प्रा. गजानन ठाकरे, प्राचार्य डॉ. सुभाष कालवे,  कृषी विद्याशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक विष्णू काकडे, प्रा. समाधान  जाधव, मृद व रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक आकाश इरतकर,  रोगशास्त्र विभागाचे प्राध्यापक विवेक हमाने, सर्व प्राध्यापक, प्राध्यापके तर कर्मचारी व प्रथम सत्राचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांची शेती शेतकर्‍यांना ठरणार मार्गदर्शककाही शेतकरी असे असतात, की त्यांच्या शेताला केव्हाही भेट द्या, आपले  समाधान होत नाही. दर वेळी त्यांच्या शेतात नवे काही अनुभवायला मिळ ते. विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनासुद्धा प्राध्यापकांनी दोन  एकर क्षेत्रावर शेतीची प्रयोगशाळा निर्माण करून दिल्याने परिसरातील शे तकर्‍यांना विद्यार्थ्यांंच्या नवनवीन प्रयोगातून निर्माण होणार्‍या शेतीतून  बरेच काही शिकायला मिळणार आहे. शेतीची ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना  कृतीतून शिक्षण देणार तर आहेच, याबरोबरच परिसरातील शेतकर्‍यांना  मार्गदर्शक ठरणारी आहे.  

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक