खुमगाव येथे विद्यार्थ्याची  आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 17:23 IST2019-01-23T17:23:33+5:302019-01-23T17:23:43+5:30

          नांदुरा: ताुक्यातील खुमगाव येथे एका विद्यार्थ्याने २२ जानेवारी रोजी संध्याकाळी घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Student suicide in Khumgaon | खुमगाव येथे विद्यार्थ्याची  आत्महत्या

खुमगाव येथे विद्यार्थ्याची  आत्महत्या


 लोकमत न्यूज नेटवर्क 
          नांदुरा: ताुक्यातील खुमगाव येथे एका विद्यार्थ्याने २२ जानेवारी रोजी संध्याकाळी घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
खुमगाव येथील सहदेव सतीश वक्ते (वय १७) हा संत गाडगेबाबा विद्यालयात अकरावीत शिकत होता. २२ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास महाविद्यालयातून घरी आल्यावर त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. विद्यार्थ्याचे आई-वडील घरात नसताना, हा प्रकार घडला. ते घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. यावेळी त्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती नामदेव रामचंद्र काळे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला कळविली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शविच्छेदनासाठी नांदुरा येथे नेण्यात आला. घटनेचा तपास नांदुरा पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Student suicide in Khumgaon