उभ्या ट्रकला धडक; १२ जखमी
By Admin | Updated: June 5, 2014 22:09 IST2014-06-05T21:58:44+5:302014-06-05T22:09:17+5:30
मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील घटना

उभ्या ट्रकला धडक; १२ जखमी
मलकापूर : लग्नाचे वर्हाड घेवून मुक्ताईनगरकडून आलेल्या टाटा ४0७ या वाहनाने उभ्या ट्रकला धडक दिल्याने १२ जण जखमी झाल्याची घटना आज ५ मे रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाहतूक पोलिस मदत केंद्राजवळ घडली.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, ट्रक क्र. आर. जे. 0७ जि. ए. २00२ हा ट्रक राष्ट्रीय महामार्ग ६ वरुन मुंबईकडून नागपूरकडे जात होता. १२ वाजेच्या सुमारास महामार्गावरील पोलिस मदत केंद्रानजिक पोलिसांनी त्याला थांबविले. तेवढय़ात मागून लग्नाचे वराड घेवून येणार्या टाटा ४0७ ने ट्रकला धडक दिली. त्या अपघातात प्रदीप ज्ञानेश्वर भोई वय २५, मधुकर सांडू भोई वय ३५ रा. चांगदेव, बळीराम नागो भोई वय ५0 रा. सिंगारधन, आत्माराम शालीग्राम भोई वय २५ रा. इच्छापूर, शालीग्राम सखाराम भोई वय ५0 रा. इच्छापूर, अजय विजय साबळे वय १५ रा. मुक्ताईनगर, राघो देवरा भोई वय ६0 रा. सिंगारधन, नारायण शिवाजी भोई वय ६0 रा. सिंगारधन, प्रकाश देवचंद भोई वय ३५ रा. घटकुल, तुकाराम काशिराम भोई वय ५0 रा. सावरगाव जामनेर, श्रीनाथ अरुण भोई वय ३५ रा. मिर्झापूर व एक असे १२ प्रवासी शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मार लागल्याने जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.