फलकाच्या विटंबनेमुळे करडीत तणाव

By Admin | Updated: September 20, 2015 23:23 IST2015-09-20T23:23:14+5:302015-09-20T23:23:14+5:30

विटंबना करणा-या समाजकंटकांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी.

Stress due to punk repellent | फलकाच्या विटंबनेमुळे करडीत तणाव

फलकाच्या विटंबनेमुळे करडीत तणाव

धाड (जि. बुलडाणा) : नजीकच्या ग्राम करडी येथील मुख्य मार्गावर लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या फ्लेक्स बोर्डच्या विटंबनेमुळे तणाव निर्माण झाल्याची घटना २0 सप्टेंबर रोजी घडली.या घटनेमुळे यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यामुळे धाडचे ठाणेदार एल.डी. सोद्मो यांच्या नेतृत्वातील पथकाने तत्काळ घटनास्थाळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात शांतता कायम ठेवण्याच्या उद्देशाने बैठक बोलविण्यात आली होती. विटंबना करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सभेमध्ये पुढे आली. यावेळी प्रमोद बोर्डे, देविदास जाधव, रामधन थोरात, किसन थोरात, किशोर जाधव, संजय तायडे, साहेबराव शंकर अवसरमोल, रमेश अवसरमोल, प्रकाश हिवाळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली.

Web Title: Stress due to punk repellent