देऊळगावमही येथील पथदिवे बंद, ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST2021-04-27T04:35:01+5:302021-04-27T04:35:01+5:30
देऊळगावमही : येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे गत काही दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ हे पथदिवे ...

देऊळगावमही येथील पथदिवे बंद, ग्रामस्थ त्रस्त
देऊळगावमही : येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे गत काही दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ हे पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ नितीन गडकरी यांनी निवेदनाची दखल घेऊन कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठवले आहे़
देऊळगावमही येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे गत काही दिवसांपासून बंद आहेत़ महामार्गावर अनेक जण फिरायला जातात. रात्री अंधार असल्याने अपघात हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे महामार्गावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर अमोल शिंगणे तालुका अध्यक्ष दे़ राजा, सचिन साळवे तालुका उपाध्यक्ष, गणेश शिंगणे, कैलास देढे, समाधान काळे, गजानन चोपडे आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.