चोरलेली तवेरा पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: July 3, 2017 01:22 IST2017-07-03T00:45:49+5:302017-07-03T01:22:45+5:30
मलकापूर : गत दोन ते तीन दिवसांदरम्यान शहरातील प्रशांतनगर परिसरातून चोरी गेलेली तवेरा गाडी मलकापूर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून ताब्यात घेण्याची कार्यवाही २ जुलै रोजी केली आहे.

चोरलेली तवेरा पोलिसांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : गत दोन ते तीन दिवसांदरम्यान शहरातील प्रशांतनगर परिसरातून चोरी गेलेली तवेरा गाडी मलकापूर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून ताब्यात घेण्याची कार्यवाही २ जुलै रोजी केली आहे.
श्याम सदाशिव खरात (वय ४०) रा.शिवाजीनगर यांची पांढऱ्या रंगाची तवेरा गाडी क्रं.एम.एच.२८-व्ही.३६७५ ही अज्ञात चोरांनी प्रशांतनगर परिसरातील रहिवासी योगेश देशमुख यांचे घराजवळून २८ ते ३० जूनदरम्यान चोरुन नेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी गाडी मालक श्याम खरात यांचे फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी ३० जून रोजीच अप क्र.३१०/२०१७ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करीत उपविभागीय पोलीस अधिकारी बोबडे यांचे मार्गदर्शनाखाली, तर पो.नि. विनोद ठाकरे यांचे आदेशान्वये सपोनि सुनील वानखेडे, पीएसआय रुपेश शक्करगे, एसआय मापारी, पोहेकॉ देशमुख, तडवी, श्याम शिरसाट, कोळी, सपकाळ, ठाकरे आदींच्या पथकाने गाडीचे शोध कार्य सुरू केले.
दरम्यान, सदर तवेरा गाडीही नाशिक जिल्ह्यातील येवला ग्रा.पं.पो.स्टे.हद्दीत येवला ते मनमाड रोडस्थित मानस हॉटेलसमोर अज्ञात चोरट्यांनी सोडून पळ काढल्याचे आढळून आले.
गाडी ही मलकापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतली असून, याप्रकरणी पुढील तपास सपोनि सुनील वानखडे व नापोकॉ दिलीप तडवी करीत आहेत.