Sting Operation : दोन दिवस सुटी मिळूनही कर्मचारी राहतात गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:26 IST2020-03-06T14:25:57+5:302020-03-06T14:26:04+5:30
दोन सुटी मिळूनही कर्मचारी कर्तव्यात कुचराई करीत असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ५ मार्च रोजी दिसून आले.

Sting Operation : दोन दिवस सुटी मिळूनही कर्मचारी राहतात गायब!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ‘लंच टाईम’च्या नावाखाली तहसिलमधील कर्मचारी दुपारी गायब झालेले दिसून आले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्यावेळेत बदल करून शनिवार व रविवार सलग दोन सुटी मिळूनही कर्मचारी कर्तव्यात कुचराई करीत असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ५ मार्च रोजी दिसून आले.
सध्या दुष्काळी अनुदान वाटप सुरु असून यासाठी तहसिल कार्यालयात शेतकऱ्यांना चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी काम करणारे कर्मचारी वेळेत कार्यालयात येत नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी असून आज दुपारी येथील महिला कर्मचारी वानरे या दुपारी लंच टाईमच्या नावाखाली कार्यालयातून बराच वेळ गायब असल्याचे निदर्शनास आले. दुपारी १ ते २ हा लंच टाईम असतांना ह्या कर्मचारी दुपारी २.४५ ला कार्यालयात आल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. या ठिकाणी दुष्काळी अनुदान चौकशीसाठी असंख्य शेतकरी आलेले होते. कर्मचारी वेळेत कार्यालयात न पोहचल्याने शेतकºयांना ताटकळत बसावे लागले. नेहमीच तहसिल कार्यालयात असा प्रकार घडत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. तरी याकडे वरीष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.
असे केले स्टिंग
खामगाव तहसिल कार्यालयातील शेतकरी मदत कक्षात कर्मचारी नसल्याची माहिती मिळाली. याआधारे प्रस्तूत प्रतिनिधीने तहसिलकार्यालयात धाव घेतली. तेव्हा शेतकरी कर्मचाºयांची वाट पाहत होते तर संबधित कक्षातील कर्मचारी गायब होते. याप्रकाराबाबत शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबत अधिकाºयांना चांगलेच खडसावले.