चालक-वाहकांची सक्तीची रजा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:58 AM2020-08-24T11:58:59+5:302020-08-24T11:59:14+5:30

खामगाव आगारातील वाहक-चालकांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

State Transport's Driver-conductor leave come to an end | चालक-वाहकांची सक्तीची रजा संपुष्टात

चालक-वाहकांची सक्तीची रजा संपुष्टात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तोट्यात वाढ झाल्याने महामंडळाने कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यानंतर आता सोमवारपासून पूर्ण क्षमतेने बसफेºया सुरू करण्याचे नियोजन केल्याने खामगाव आगारातील वाहक-चालकांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एसटीच्या जिल्ह्यात काही ठिकाणी बसफेºया सुरु असूनही प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने खामगाव आगारातील बस फेºया कमी व कर्मचारी जास्त असे चित्र निर्माण झाले होते. परिणामी बस आगारातील ५० टक्के वाहक-चालकांसह कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली. आगारातील ११८ चालक, ११० वाहकांना आळीपाळीने रजा देण्यात आली.
लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर राज्य परिवहन महामंडळाला जिल्हाअंतर्गत बस फेºया सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. तरीही महामंडळाचा तोटा वाढतच चालला आहे. कोरोनाने अनेक उद्योगधंदे बंद पाडले. अनेकांच्या हातचा रोजगार हिरावला.

 

Web Title: State Transport's Driver-conductor leave come to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.