मोताळा येथे राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:31 AM2021-04-12T04:31:50+5:302021-04-12T04:31:50+5:30

ही निबंध स्पर्धा प्राचार्य डॉ. सुनील मामलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे संयोजक अर्थशास्त्र ...

State Level Online Essay Competition at Motala - A | मोताळा येथे राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा - A

मोताळा येथे राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा - A

Next

ही निबंध स्पर्धा प्राचार्य डॉ. सुनील मामलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे संयोजक अर्थशास्त्र विभाग प्रमुख व रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. पुरुषोत्तम चाटे होते. तर या स्पर्धेचे समन्वयक रसायनशास्त्र विभागातील प्रा.नागेश गट्टूवार व सहसमन्वयक म्हणून रसायनशास्त्र विभागातील प्रा.नीलेश राहाटे व प्राणीशास्त्र विभागातील डॉ.अरुण गवारे यांनी जबाबदारी पार पाडली. कोविड -१९ च्या प्रादुर्भावाचा विचार करून राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या घरून स्व:हस्तलिखित निबंध तयार करून ऑनलाईन पाठविले. थम क्रमांक एस.एन.मोर महाविद्यालय, भंडारा येथील स्नेहा चंदनलाल चौधरी हिने प्राप्त केला. दुसरा क्रमांक शिवाजी महाविद्यालय चिखली येथील साक्षी सुनील चव्हाण, तिसरा क्रमांक शिवाजी महाविद्यालय अकोला येथील गायत्री विठ्ठलराव देशमुख हिने प्राप्त केला. या सर्व विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस ऑनलाईन स्वरूपात देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण आभासी पद्धतीने करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव भारतभर साजरा होत असताना श्री शिवाजी महाविद्यालयाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करून तरुणांना भारताच्या इतिहास, वर्तमान व भविष्य याबद्दल व्यक्त होण्यास संधी उपलब्ध करून दिली. सहभागी स्पर्धकानी अंतर्मुख करणारे विचार आपल्या लिखाणातून मांडले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रत्येक घटकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य लाभले.

Web Title: State Level Online Essay Competition at Motala - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.