नगरपरिषद निवडणुकीच्या कामाला लागा- पडघान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:44+5:302021-07-05T04:21:44+5:30

मेहकर: नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आवाहन मेहकर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील पडघान यांनी केले़ ते ...

Start the work of Municipal Council Election- Padghan | नगरपरिषद निवडणुकीच्या कामाला लागा- पडघान

नगरपरिषद निवडणुकीच्या कामाला लागा- पडघान

मेहकर: नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आवाहन मेहकर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील पडघान यांनी केले़ ते स्थानिक विश्रामगृह मेहकर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम पाटील पडघान हे होते.

ज्येष्ठ नेते भास्करराव काळे, प्रभाकरराव सपकाळ, आफताब खान,राजाभाऊ रहाटे, गजानन सावंत, संदिप पांडव या सर्वांनी मनोगत व्यक्त केले.नगरपरिषद निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष ॲड. नाजेर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यावर विचार व चर्चा झाली. या बैठकीला यासीन बेग, अरुण ठोकरे, विलास बचाटे, कैलास जाधव, रहीम गवळी, लक्ष्मण मंजुळकर, कैलास सावंत, भरत लांडकर,शिवा गारोळे,सुमेर खान, महेबूब गवळी,योगेश चिखलेकर,शे नवेद,सनी मोरे, सद्दाम कुरेशी,रवी राऊत,अफरोज अली, दिलीप सावंत,सलिम गवळी, विकास पवार, इस्माईल गवळी,अमिर चौधरी, सत्तार कुरेशी,राजेश नवले,अतुल वानखेडे, कृष्णा मंजुळकर उपस्थित होते. संचालन आयोजक मेहकर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष निसार अन्सारी यांनी केले तर आभार विजय वायाळ यांनी मानले.

Web Title: Start the work of Municipal Council Election- Padghan