शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमना नदीतील गाळ काढण्याला सुरुवात

By admin | Updated: July 31, 2015 23:31 IST

लोकसहभागातून आमना नदीचे खोलीकरणासाठी गाळ काढणे व रुंदीकरणाच्या कामाची सुरुवात; जलपातळीत होणार वाढ.

देऊळगावराजा (बुलडाणा): लोकसहभागातून शहरातील आमना नदीचे खोलीकरणासाठी गाळ काढणे व रुंदीकरणाच्या कामाची सुरुवात अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनात ३१ जुलै रोजी करण्यात आली. नदीच्या सौंदर्यकरण या अभिनव उपक्रमाने शेतकर्‍यांना आणि शहरवासीयांना फायदा होणार आहे. त्यामुळे यात नागरिकांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे तसेच शेतकर्‍यांनी नदीतील गाळांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे यांनी केले. गेल्या किती वर्षापासुन शहरातील आमना नदीचा अस्तित्व हरवून गेला होता. महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून ३१ जुलै रोजी आमना नदीतून गाळ उपसा करण्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळ, उपविभगीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाड, तहसीलदार शंकर बुटले, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड, मुख्याधिकारी अनिल अढागळे, माजी उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, नगराध्यक्षा सौ.मालतीताई कायंदे, उपाध्यक्ष सै.करीम, नगरसेवक नंदन खेडेकर, मुरलीधर कांबळे, विष्णु रामणे आदी उपस्थित होते. लोकसहभागातून सुरु झालेल्या या अभियानास शेतकर्‍यांनी आणि नागरिकांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद देत ट्रॅकटरने गाळ नेण्यास सुरुवात केली होती. हा गाळ शेतकर्‍यांना विनामुल्य दिला जातो आहे. आमना नदीतील गाळामध्ये सँड, सिल्ट आणि क्ले असे तीन घटक या गाळात जास्त प्रमाणात असल्याने पिकांसाठी हा गाळ संजीवनी ठरणार आहे. यामुळे जमिनीतील सुपीकता वाढुन पोत चांगली होते. यात बी बियाण्यास प्रतिसाद मिळतो आणि यामुळेच उत्पादन क्षमता वाढते व शेतकर्‍याला फायदा होतो. त्यामुळे या गाळाचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकर्‍यांना करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक, पत्रकार, विविध पक्षाच्या पदाधिकारी, न.प.कर्मचारी, तहसील कर्मचारी आदि उपस्थिीत होते.