मुद्रांक विक्रेता, दस्त लेखक संपावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:46 IST2017-10-10T23:46:22+5:302017-10-10T23:46:45+5:30

चिखली : शासनाला दररोज लाखो रुपयांचा महसूल गोळा  करून देणारे राज्यांतील विविध भागातील मुद्रांक विक्रेते व दस् तलेखनिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ९ ऑक्टोबर पासून  बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या  दुसर्‍या दिवशीही सर्व कामकाज बंद असल्याने येथील सह.  दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.

Stamp Dealer, Stamp Deed! | मुद्रांक विक्रेता, दस्त लेखक संपावर!

मुद्रांक विक्रेता, दस्त लेखक संपावर!

ठळक मुद्देसह.दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट९ ऑक्टोबर पासून पुकारले काम बंद आंदोलन 

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शासनाला दररोज लाखो रुपयांचा महसूल गोळा  करून देणारे राज्यांतील विविध भागातील मुद्रांक विक्रेते व दस् तलेखनिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ९ ऑक्टोबर पासून  बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या  दुसर्‍या दिवशीही सर्व कामकाज बंद असल्याने येथील सह.  दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.
राज्यांतील मुद्रांक विक्र ेते संघटनेने आपल्या मागण्यांबाबत  फेब्रुवारीला महसूल मंत्नी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन  सकारात्मक चर्चा केली होती; मात्न त्यास सात महिने झाले, तरी  त्यावर शासकीय पातळीवर कोणताही विचार न झाल्याने मुद्रांक  विक्रेत्यांनी आंदोलनाचे अस्त्न उपसले आहे. त्यानुसार येत्या ९  ऑक्टोबर पासून मुद्रांक विक्र, दस्तलेखन, ई-चलन बनविणे  आदी कामे बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान गेल्या दोन  दिवसांपासून ही कामे बंद असल्याने नागरीकांचीही परवड होत  असून शासनाचा मोठय़ा प्रमाणात महसूल बुडत आहे.  
मुद्रांक विक्रेत्यांना १0 टक्के कमीशन देण्यात यावे,  ई-चलन  प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्र ेते व दस्त लेखक यांच्या मार्फतच  राबविण्यात यावी, मयत मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने वारस हक्काने  दिले जावे तसेच शासनाने कमी किमतीच्या १0, २0 व ५0 रू पयांच्या स्टॅम्पची छपाई पुन्हा सुरू करावी, आदी मागण्यांसाठी हे  आंदोलन छेडण्यात आले असून आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी  येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट दिसून  आला. दरम्यान मुंद्राक विक्रेते व लेखनिकांच्या न्याय  मागण्यांसाठी जिल्हय़ातील सर्व दस्त लेखक व मुद्रांक विक्रे त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे व आंदोलन यशस्वी  करावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी  केले आहे. 
-

Web Title: Stamp Dealer, Stamp Deed!