एसटी महामंडळाने केला वर्धापन दिन साजरा

By Admin | Updated: June 2, 2014 00:35 IST2014-06-02T00:22:34+5:302014-06-02T00:35:11+5:30

समस्यांचा डोंगर अन् अपेक्षांचे ओझे घेऊन धावणार्‍या एसटी महामंडळाने केला बुलडाण्यात वर्धापन दिन साजरा

ST corporation celebrates anniversary day | एसटी महामंडळाने केला वर्धापन दिन साजरा

एसटी महामंडळाने केला वर्धापन दिन साजरा

बुलडाणा : भंगार गाड्या, टायरचा तुटवडा अधिकारी, कर्मचार्‍यांचे होत असलेले दुर्लक्ष त्यामुळे वाढलेले ब्रेकडावूनचे प्रमाण पर्यायाने उत्पन्नात होत असलेली घट या बरोबरच खाजगी प्रवाशी वाहतुकीचे उभे ठाकलेले मोठे आव्हान अशा एक ना अनेक समस्यांचा डोंगर आणि प्रवाशांच्या अपेक्षांचे ओझे घेवून गाव-खेड्यात, वस्ती तांड्यावर धावणार्‍या एसटीने ६६ वर्षे पुर्ण केली. रविवारी राज्यभरातील एसटीच्या ५९७ बसस्थानकावर हा ६६ वा वर्धापन दिन ह्यपरिवहन दिनह्ण म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी एसटीचे बसस्थानके रोषणाईने सजविण्यात आली होती.तर बसस्थानकांवर प्रवाशांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बुलडाण्यातही हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. उपविभागीय पोलिस पोलिस अधिकारी समिर शेख हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. बुलडाणा अमरावती बसचे पुजन करून त्यांनी कार्यक्रमाला सुरूवात केली. यावेळी विभाग नियंत्रक चंद्रकांत बोरसे, विभागय वाहतुक अधिकारी पृथ्वीराज ठाकुर,आगार व्यवस्थापक किरण भोसले, स्थानक प्रमुख दिपक साळवे, कार्यशाळा अधिक्षक इलामे, कामगार संघटनेचे लतीफ यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येनी उपस्थित होते. 

*वर्धापन दिनी झाली पुन्हा भाडेवाढ परिवहन महामंडळाला १ जून रोजी ६६ वर्ष पुर्ण झाले आहेत. राज्यभरात एसटीने १ जून हा परिवहन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असतानाच या वर्धापन दिनापासून प्रवाशांच्या स्वगता बरोबरच एसटीची भाडेवाढ करून अच्छे दिन आ गये चा ? धक्का प्रवाशांना दिला आहे. ३१ मे च्या मध्यरात्री पासून ही भाडेवाढ करण्यात आली आहे. साध्या जलद एसटी ला प्रतिटप्पा ६ रूपये २0 पैसे तर रात्रसेवा गाडीसाठी ७.३५ रूपये, निमआराम गाडीला ८.४५ रूपये तर वातानुकूलीत निमआराम बसला ११.४0 रुपये आणि वातानुकूलीत शितल बसला १५.५५ रुपये तर वातानुकूलीत स्लिपर कोचला १५.७0 रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहे

Web Title: ST corporation celebrates anniversary day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.