एसटीची दुचाकीला धडक तिघे जखमी
By अनिल गवई | Updated: April 29, 2023 16:06 IST2023-04-29T16:06:10+5:302023-04-29T16:06:34+5:30
खामगाव जनुना चौफुलींवरील घटना

एसटीची दुचाकीला धडक तिघे जखमी
अनिल गवई (खामगाव, जि. बुलढाणा), लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: दुचाकीवरून जात असलेल्या तिघांना एसटी बसने धडक दिली. यात दुचाकीवरील तिघे जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजता दरम्यान जनुना चौफुलींवर घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील जनुना येथील उमेश दयाराम डाबेराव ३५ पत्नी सौ. मुक्ता उमेश डाबेराव आणि दोन वर्षीय चिमुकली आराध्या डाबेराव हिला घेऊन दुचाकीने चिंचोली येथे जात होते. दरम्यान, जनुना चौफुलींवर छत्रपती संभाजी नगर येथून नागपूर जात असलेल्या एम एच २० बीएल २४६१ या क्रमांकाच्या एसटीने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील चिमुकलसह तिघे गंभीर जखमी झाले.
तसेच एमएच २८ एन ५३७७ या दुचाकीचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल केले. अपघातग्रस्त एसटी बस पोलीस स्टेशनला लावण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई ग्रामीण पोलीस करीत आहेत.