एसटी वाहक तरूणीची गळा चिरूण निर्घृण हत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:34 IST2021-04-17T04:34:20+5:302021-04-17T04:34:20+5:30

चिखली : बुलडाणा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय घटस्फोटीत तरूणीचा तालुक्यातील अंत्री खेडेकर शिवारात गळा चिरलेल्या अवस्थेत ...

ST carrier girl strangled to death | एसटी वाहक तरूणीची गळा चिरूण निर्घृण हत्या !

एसटी वाहक तरूणीची गळा चिरूण निर्घृण हत्या !

चिखली : बुलडाणा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय घटस्फोटीत तरूणीचा तालुक्यातील अंत्री खेडेकर शिवारात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतक तरूणीच्या गळ्यावर तसेच शरीरावर धारधार शस्त्राने वार केल्याचे व अंगावर चटके दिल्याच्या खुणा आहेत.

त्यामुळे तिचा खून झाला असल्याचा कयास व्यक्त केला जात असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. माधुरी भीमराव मोरे (२५, रा. अंत्री खेडेकर) असे मृत तरूणीचे नाव आहे. बुलडाणा आगारात वाहक पदावर त्या कार्यरत होत्या. १५ एप्रिलची ड्यूटी संपल्यानंतर आठवडे सुटी असल्याने अंत्री खेडेकरला घरी परतणार होत्या. मात्र, रात्री त्या घरी पोहचल्या नाही. १६ एप्रिलच्या सकाळी अंत्री खेडेकर शिवरात मॉर्निंग वाॅकसाठी गेलेल्या नागरिकांना त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत अंढेरा पोलिसांना माहिती दिली असता ठाणेदार राजरत्न आठवले यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असता तरूणीचा गळा चिरलेला व शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तसेच चटके दिल्याच्या खुणा पार्थिवावर आढळून आल्या आहेत.

घटनेचे गांभीर्य पाहता बुलडाणा येथून श्वान पथकास ही पाचारण करण्यात आले होते. ठसे तज्ज्ञांनी ही घटनास्थळाची पाहणी केली असून आवश्यक अशी माहिती व काही पुरावे हस्तगत केले आहेत. मृत महिला माधुरी मोरे यांचा ५ वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला आहे. यापूर्वी त्या जाफ्राबाद आगारात कार्यरत होत्या.

Web Title: ST carrier girl strangled to death