एसटी बसच्या काचा फोडल्या
By Admin | Updated: June 4, 2014 00:44 IST2014-06-04T00:05:25+5:302014-06-04T00:44:03+5:30
मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने कार्यकर्त्यांच्या भावना अनावर

एसटी बसच्या काचा फोडल्या
लोणार : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे तालुक्यातील वंजारी समाजावर शोककळा पसरली. सावरगाव मुंडे येथे संतप्त युवकांनी दोन एसटी बसच्या काचा फोडून राग व्यक्त केला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री ना. मुंडे यांचे अपघाती निधन झाल्याची वार्ता कळताच शहरातील व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद केली तसेच स्थानिक बसस्टॅन्ड चौकात सर्व समाजबांधवांच्यावतीने त्यांना ङ्म्रद्धांजली वाहण्यात आली.