शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

 पावसाअभावी पिकांवरील फवारणी ठरतेय ‘फेल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 15:34 IST

तणाचा नायनाट करण्याकरीता शेतकरी तणनाशक फवारणी करत आहेत; मात्र पावसाअभावी पिकांवरील ही फवारणीही फेल ठरत आहे.

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतात तणाचा जोर वाढला असून पिकांना मात्र धोका निर्माण झाला आहे. ह्या तणाचा नायनाट करण्याकरीता शेतकरी तणनाशक फवारणी करत आहेत; मात्र पावसाअभावी पिकांवरील ही फवारणीही फेल ठरत आहे. फवारणीसाठी आवश्यक ओलावाच जमीनीत राहिला नसल्याने शेतकºयांचे महागडे औषध पिकालाच मारक ठरत आहे. जिल्ह्यात ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी ८५ टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावरी खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या १५ दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे या पिकांमध्ये तणाचे प्रमाणही झपाट्याने वाढले. अत्यंत कमी पावसातही शेतात तण वाढू शकते, त्यामुळे शेतामध्ये पिकांपेक्षा आढाव तणच अधिक दिसून येत आहे. हे तण नष्ट करण्याकरीता शेतकरी महागडे तणनाशक फवारणी करताना दिसून येत आहेत. मात्र तणनाशक फवारणीसाठी काही ठिकाणी आवश्यक तेवढ्याप्रमाणात जमीनीत ओलावा नसल्याने या तणनाशकाचा सुद्धा पाहिजे तसा फायदा होताना दिसून येत नाही. कुठलेही तणनाशक फवारणीकरीता जमिनीमध्ये ओलावा असणे महत्त्वाचे असते, परंतू जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यात २१९.९ मि.मी. म्हणजे ३२.९३ टक्केच पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यातही देऊळगाव राजा, लोणार तालुक्यात १७ व २२ टक्क्यापर्यंतच पाऊस झाला आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामुळे तणनाशक फवारणी शेतकºयांसाठी आर्थिक भूर्दंड ठरत आहे. परिणामी, काही ठिकाणी शेतकºयांनी पारंपारीक पद्धतीने डवरणपाळी करण्याला सुरूवात केली आहे. 

जिल्ह्यात फवारणीचा ट्रेंड बदलला

पूर्वी पाठीवरच्या पेट्रोल पंपाद्वारे फवारणी केल्या जात होती, मात्र आता जिल्ह्यात फवारणीचा ट्रेंड काहीसा बदललेला दिसून येतो. पाठीवरच्या पंपाची जागा ट्रॅक्टरच्या फवारणी पंपाने घेतली आहे. या ट्रॅक्टरला मागच्या बाजूला एक ५०० लिटरची टाकी आहे. त्या टाकीच्या ठिकाणाहून जवळपास १ हजार मीटर नळीद्वारे फवारा जातो. फवारणीच्यावेळी ट्रॅक्टर शेताच्या बांधावर उभे करून संपुर्ण शेताची फवारणी नळीद्वारे केली जाते. फवारणीची नळी पकडण्यासाठी चार ते पाच मजूर लागतात. एका टाकीच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना ८०० ते १ हजार रुपये मोजावे लागत आहेत.पिकांमध्ये तणाचे प्रमाण वाढल्याने शेतकरी तणनाशकाची फवारणी करत आहेत. मात्र शेतामध्ये आवश्यक त्या प्रमाणात ओलावा असेल, तरच तणनाशकाची फवारणी करावी. तणनाशक फवारणीपूर्वी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या शिफारशीनुसारच फवारणी करावी.- डॉ.सी.पी. जायभाये,कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस