सायकलींग स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: August 21, 2014 23:22 IST2014-08-21T23:22:04+5:302014-08-21T23:22:04+5:30
स्पर्धेकरिता १00 ते १२0 मुले-मुली खेळाडुंनी सहभाग नोंदविला.

सायकलींग स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणाच्यावतीने जिल्हास्तर शालेय व ग्रामीण सायकलींग क्रीडा स्पर्धांचे आयोजन धाड नाका, बुलडाणा येथे करण्यात आले. सदर स्पर्धेकरिता १00 ते १२0 मुले-मुली खेळाडुंनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेत शिवाजी गोरे, आदेश बरडे, मनोज कापरे, लक्ष्मण काळे, सारिका पोपळघट, नेहा गवई, कृष्णा सावळे, तुकाराम चव्हाण, मुशर्रफ नईम शेख, निखिल गवई, लक्ष्मी खराट, नेहा इंगळे, पायल जाधव, श्रेया रगडे, पवन सुरुशे, मंगेश साळवे, गोपाल चव्हाण, मो.सिद्धीक मो.इलीयास, स्नेहा कड, भारती बावणे, जनाबाई बावणे, अर्श्विनी शिंगणे यांनी विजय संपादन केला. तसेच राजीव गांधी खेळ अभियान अंतर्गत ग्रामीण क्रीडा स्पर्धेत अमर विलास कटारे, सतीश शिरे, शुभम जावळे, अजय गव्हाणे, शिवम इंगळे, स्वप्नील जाधव, संदेश जाधव, तर मुलींमध्ये विद्या जाधव, लक्ष्मी खराट, नेहा इंगळे, वैष्णवी ठेंग, शिवाणी उबरहंडे, प्रतीक्षा डुकरे, पल्लवी ठेंग यांनी विजय संपादन केला. स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.