भरधाव ट्रकची टिप्परला धडक; एक ठार, एक गंभीर; मेहकर-जालना मार्गावरील किनगावराजानजीकची घटना
By संदीप वानखेडे | Updated: May 6, 2024 16:09 IST2024-05-06T16:08:09+5:302024-05-06T16:09:13+5:30
ही घटना मेहकर-जालना महामार्गावरील किनगावराजानजीक ५ मेच्या रात्री घडली. प्रवीण भीमराव मुळे, असे मृतक चालकाचे नाव आहे.

भरधाव ट्रकची टिप्परला धडक; एक ठार, एक गंभीर; मेहकर-जालना मार्गावरील किनगावराजानजीकची घटना
राहेरी बु. : भरधाव ट्रकने समाेरून येत असलेल्या टिप्परला जबर धडक दिल्याने टिप्परचालक जागीच ठार झाला तर एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला. ही घटना मेहकर-जालना महामार्गावरील किनगावराजानजीक ५ मेच्या रात्री घडली. प्रवीण भीमराव मुळे, असे मृतक चालकाचे नाव आहे.
ट्रक (एमएच ४६ एएफ ६७७५)ने चालक नामे पुंजाराम श्रावण कोसरे हे जात हाेते. मेहकर ते जालना रस्त्यावर टिप्पर (एमएच २८ बीबी १४३१)ला ट्रक समोरून जबर धडक दिली. यामध्ये प्रवीण मुळे हे जागीच ठार झाले तर ट्रकचालक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी बाळकृष्ण काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगावराजा पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या आदेशाने किनगावराजा पोलिस स्टेशनचे विष्णू मुंडे हे करीत आहेत.