शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भरधाव टिप्परची बसला धडक, २४ प्रवासी जखमी; समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवरील घटना

By संदीप वानखेडे | Updated: March 24, 2023 19:02 IST

ही घटना समृद्धी महामार्गावरील फर्दापूरजवळील इंटरचेजजवळ २४ मार्च राेजी दुपारी घडली.

मेहकर : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने बसला धडक दिल्याने २४ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना समृद्धी महामार्गावरील फर्दापूरजवळील इंटरचेजजवळ २४ मार्च राेजी दुपारी घडली.

मेहकर आगाराची मानव विकास मिशनची बस क्र. एमएच १४ बीटी ४५४३ ही प्रवासी घेऊन शेगाववरून मेहकरकडे जात हाेती. दरम्यान समृद्धी महामार्गावरील फर्दापूरजवळील इंटरचेंजवर रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या अज्ञात टिप्परने बसला जबर धडक दिली. या अपघातात बसमधील २४ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये प्रवीण सुभाष बोरकर (रा. हिवरा खुर्द), परसराम अर्जुन देऊळकर (रा. ब्रह्मपुरी), रामेश्वर त्र्यंबक हिवरकर, मदन उत्तम गाडे, सीताराम जानकीराम दळवी (सर्व रा. हिवरा खुर्द), रवीना राजू घायाळ (रा. मुंडेफळ) नामदेव दशरथ फलाने (रा. जानेफळ), वाल्मीक राजाराम मुरडकर (रा. जानेफळ), यश भगवान इंगळे (रा. अमडापूर), अश्रू वामन बोरकर (रा. हिवरा खुर्द), विठोबा मासाजी गायकवाड (रा. हिवरा खुर्द), सतीश विठोबा गायकवाड (रा. हिवरा खुर्द), पुंजाजी रंगनाथ बोरकर (रा. हिवरा खुर्द), माधव अमृता नाळगे (रा. इसोली), रत्नकला विष्णू काळे (रा. डोणगाव), श्रावणी राजू जाधव (रा. पिंपरखेड), पांडुरंग शंकर भोलनकर (रा. पिंपरखेड, विमल विठोबा गायकवाड (रा. हिवरा खुर्द), रुक्मिणा भीमराव अवसरमोल (रा. घाटनांद्र), किरण राजू जाधव (रा़ पिंपरखेड), रामेश्वर सखाराम भोपळे (रा. हिवरा खुर्द), मनोज सिंग देवसिंग राठोड (रा. विठ्ठलवाडी), सिद्धार्थ संतोष वानखेडे (रा. गोंडाळा), सुमनबाई मानसिंग राठोड (रा. विठ्ठलवाडी) आदींचा समावेश आहे.

जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ़ प्रताप जामकर व नीलेश मेहेत्रे, एएनएम सविता चराटे यांनी उपचार केले. रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सागर कडभने यांनीही जखमींना रुग्णालयात पाेहचविण्यासाठी मदत केली. 

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा