विशेष पोलीस महानिरिक्षक रामनाथ पोकळे यांची घेतला शहर पोलीस स्टेशनचा आढावा
By अनिल गवई | Updated: March 16, 2024 16:31 IST2024-03-16T16:31:12+5:302024-03-16T16:31:37+5:30
यावेळी शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रवीण नाचणकर यांनी त्यांना मानवंदना दिली.

विशेष पोलीस महानिरिक्षक रामनाथ पोकळे यांची घेतला शहर पोलीस स्टेशनचा आढावा
खामगाव: अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी शनिवारी खामगाव शहर पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रवीण नाचणकर यांनी त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी केली.
या तपासणी दरम्यान पोलीस स्टेशन, व पोलीस स्टेशन परिसराची पाहणी केली, तसेच पोलिस कर्मचारी सर्व अधिकारी व यांचे कामाचा आढावा घेऊन चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे स्वागत केले. तसेच त्यांनी पोलीस कर्मचारी यांचा दरबार घेऊन त्यांना असणाऱ्या अडीअडचणी ऐकून घेतल्या तसेच त्यांना कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी बाबत विचारणा केली. यावेळी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक, अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार, सुरेश नाईकनवरे यांच्यासह पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी हजर होते.