कोरोनाच्या लाटेत आटला दातृत्वाचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:01+5:302021-04-25T04:34:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जानेफळ : कोरोनाच्या पहिल्या लाटेत हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक दात्यांनी हात पुढे ...

A source of generosity in the waves of the Corona | कोरोनाच्या लाटेत आटला दातृत्वाचा झरा

कोरोनाच्या लाटेत आटला दातृत्वाचा झरा

लोकमत न्यूज नेटवर्क

जानेफळ : कोरोनाच्या पहिल्या लाटेत हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक दात्यांनी हात पुढे केले होते. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, सध्या थैमान घालणारी कोरोनाची दुसरी लाट आणि लागू असलेली संचारबंदी यात हातावर पोट असणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दातृत्वाचा झरा आटल्याचे चित्र जानेफळ येथे पाहायला मिळत आहे.

गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची रोजीरोटी गेली होती. शिवाय मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे पोटाची भूक कशी भागवावी, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्यावेळी मदतीसाठी अनेक दानशूर तथा समाजसेवकांचे हात पुढे आले होते. यावेळी काहींनी जीवनावश्यक वस्तूंचे तर काहींनी कपडे व फळांचे वाटप केले होते तसेच स्थानिक जिल्हा परिषद मराठी शाळेत गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून खिचडी, पुरी-भाजी तयार करून गावात त्याचे वाटप केले होते तसेच लोकवर्गणीतून जमा झालेल्या गहू व तांदळाचेसुद्धा वाटप करण्यात आले होते. आरोग्य विभागातील डॉक्टर्स व कर्मचारी तसेच महसूल विभागाने जीव धोक्यात घालून त्यावेळी काम केले होते. त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून सामाजिक संघटनांनी तसेच लोकप्रतिनिधींनी कोरोना योद्धा म्हणून त्यांचे सत्कार केले होते. मात्र, गेल्यावर्षीपेक्षा यावर्षीची कोरोनाची स्थिती भीषण असल्याने कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सुरत, नाशिक अशा उद्योग नगरींच्या ठिकाणी कामासाठी गेलेले लोक गावाकडे परतले आहेत. या लोकांना तसेच इतर हातमजुरी करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र दानशुरांचे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे हात आखडल्याचे दिसत आहे.

Web Title: A source of generosity in the waves of the Corona