कृषी विभागातील समस्या सोडवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:05+5:302021-09-02T05:15:05+5:30

चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील कृषी विभागाअंतर्गत असलेल्या विविध समस्यांच्या संदर्भात आमदार श्वेता महाले यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांची १ ...

Solve the problems in the agriculture department! | कृषी विभागातील समस्या सोडवा !

कृषी विभागातील समस्या सोडवा !

Next

चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील कृषी विभागाअंतर्गत असलेल्या विविध समस्यांच्या संदर्भात आमदार श्वेता महाले यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांची १ सप्टेंबर रोजी भेट घेतली. दरम्यान, कृषी विभागाशी निगडित या समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन देखील आ. महालेंनी मंत्री भुसे यांना दिले.

पीक विम्यासंदर्भात दादा भुसे यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत आमदार श्वेता महाले यांनी जिल्ह्यासह चिखली मतदारसंघात असलेल्या विविध कृषी विभागाच्या समस्यांकडे लक्ष वेधले. चिखली तालुक्यात सन २०२०-२१ नैसर्गिक आपत्तीमध्ये ११,९९६ शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. पैकी ६,५२० शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी झालेले होते. पीकविमा कंपनीने केवळ १२४८ शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाईस पात्र ठरविले आहे. शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे असतानाही विमा काढलेल्या ६५२० शेतकऱ्यांपैकी तब्बल ५ हजार २७२ शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही, ही बाब कृषिमंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली. या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबत आदेशित करण्याची मागणी आ. महाले यांनी केली आहे. तसेच चिखली तालुक्याकरिता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०१९-२० अंतर्गत अनुदान अद्याप प्रलंबित आहे ते तत्काळ मिळावे व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत लागवडीचे लक्षांक देताना ते वाढवून देण्यात यावे, तसेच सामूहिक शेततळे व यांत्रिकीकरण योजनेची व्याप्ती वाढविण्यात यावी, अशी मागणीही आ. महाले यांनी केली आहे.

दुष्काळी अनुदान तातडीने द्या !

गतवर्षी संततधार पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान झालेले होते, तर यावर्षी कमी पावसाने पिके कुपोषित झालेली आहेत. जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या आत आलेली असतानाही दुष्काळी अनुदान अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाही. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जही मिळालेले नाही. याकडेही आ. महालेंनी लक्ष वेधले असून, या पृष्ठभूमीवर दुष्काळी अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी मंत्री भुसेंकडे केली आहे.

Web Title: Solve the problems in the agriculture department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.