शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

लोकमतने जोपासली सामाजिक बांधिलकी - आमदार संजय कुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 19:15 IST

Social Commitment by Lokmat - MLA Sanjay Kute: लोकमत वृत्तपत्र समूहाने "लोकमत रक्ताचं नातं" हा उपक्रम राबवून गरजू रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे,असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ.संजय कुटे यांनी केले.

जळगाव जामोद :  लोकमतने आजतागायत अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपली बांधिलकी समाजातील विविध घटकांशी आहे हे सिद्ध करून दाखविले.कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा पडलेला तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाने "लोकमत रक्ताचं नातं" हा उपक्रम राबवून गरजू रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे,असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ.संजय कुटे यांनी केले.       सेठ तुळशीरामजी ढोकणे कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव येथे सोमवार १२ जुलै रोजी स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उद् घाटक म्हणून माजी मंत्री आमदार डॉ.संजय कुटे बोलत होते. अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.कृष्णराव इंगळे हे होते तर पणन महासंघाचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते अँड. प्रसेनजीत पाटील,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अँड.ज्योतीताई ढोकणे,सेनेचे तालुकाप्रमुख गजानन वाघ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभियंता प्रकाशसेठ ढोकणे,आसलगावचे सरपंच सुनील डीवरे, उपसरपंच गणेश गिर्ह यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य सुनील येनकर,माजी सरकारी वकील अँड.बाळासाहेब खिरोडकर,प्राचार्या ज्योतीताई वनारे,उल्हास मोहोदे,गजानन सरोदे,रामा इंगळे अझहर देशमुख,नीलेश शर्मा,मुख्याध्यापक वामनराव फंड,विष्णू इंगळे,ज्ञानदेव गायकी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.        या शिबिरात सेठ तुळशीरामजी ढोकणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राचार्य व शिक्षक, लघुसिंचन विभाग,कृषी विभाग,पंचायत समिती, आसलगावचे नागरीक यांनी रक्तदान करून लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला सहकारी पतसंस्थेने विशेष सहकार्य केले.प्रास्ताविक प्रा.नानासाहेब कांडलकर यांनी केले तर प्रा.अतुल उमाळे यांनी संचालन केले. प्राचार्या ज्योतीताई वानेरे यांनी आभार मानले.सेठ तुळशीरामजी ढोकणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या चमूने विशेष परिश्रम घेतले.

रक्त संकलनाचा लोकमतने गाठला उच्चांक-कृष्णराव इंगळेसध्या महाराष्ट्राला रक्त साठ्याची गरज असतांना लोकमतने रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलन केले व करीत आहे.त्यामुळे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघून एक नवा उच्चांक प्रस्थापित होईल असा विश्वास माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदDr. Sanjay Kuteसंजय कुटेLokmat Eventलोकमत इव्हेंट