शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम गावांसाठी सर्प प्रतिविष किट्स !

By admin | Updated: January 28, 2015 00:05 IST

वनविभाग घेणार दखल ; वारंवार सर्पदंशाच्या घटना घडणा-या गावांचा समावेश.

जयदेव वानखडे / जळगाव जामोद (बुलडाणा):वनपरिक्षेत्रांतर्गत तथा इतर दुर्गम भागामध्ये ज्याठिकाणी सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात आणि लवकर औषधोपचार मिळत नाही. दवाखाना गावापासून खूप लांबच्या अंतरावर आहे, अशा गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात असते. अशा दुर्गम ठिकाणी एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला तर केवळ लवकर उपचार मिळाला नाही म्हणून त्या रूग्णाला प्राणास मुकावे लागते. अशा गावातील जनतेची दखल आता वनविभागाने घ्यायची ठरवले असून, त्या गावामध्ये सर्प प्रतिविष किट्स मागणीचे प्रस्ताव उपवनसंरक्षक वनविभाग बुलडाणा यांच्याकडून मागविण्यात आले आहेत.ज्या गावामध्ये सर्पदंशाच्या घटनेने लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि जी गावे दुर्गम क्षेत्रात आहेत अशा गावांमध्ये वनविभागाच्यावतीने सर्प प्रतिविष किड्स ठेवण्यात येणार आहेत. याबाबत गावातील समाजसेवी व्यक्तींना प्रशिक्षण देऊन संकटाचे वेळी त्याचा वापर कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे, त्यामुळे सर्पदंशाने, वेळेवर उपचाराअभावी मृत्यू येणार्‍यांची संख्या निश्‍चितच घटेल. तालुक्यातील दुर्गम क्षेत्र व सर्पदंशाच्या घटना ज्या गावात घडल्या अशा भिंगारा, कुवरदेव, गोमाल, सोनबर्डी, हनवतखेड, रायपूर, खेर्डा, पळशी सुपो, धानोरा, इस्लाम पूर, सावरगाव, आडोळ इत्यादी गावांसह जळगाव, संग्रामपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या किट्स ठेवण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे ठरविण्यात आले. *आदिवासी परिसरात विषारी साप अधिक प्रमाणात आढळतात. आतापर्यंंत उपचाराअभावी अनेकांना आपले प्राण गमावावे लागले. नाग आणि मण्यार या विषारी सर्पांंच्या जाती येथे आढळतात. तर फुरसे तुरळक प्रमाणात दिसतो. घोणस अद्याप परिसरात आढळला नाही.