वंचित आघाडीचा स्वबळाचा नारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST2021-09-25T04:37:46+5:302021-09-25T04:37:46+5:30

चिखली : आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने चिखली येथे २३ सप्टेंबर रोजी तालुका सत्ता संपादन मेळावा पार पडला. ...

The slogan of self-reliance of the deprived front! | वंचित आघाडीचा स्वबळाचा नारा !

वंचित आघाडीचा स्वबळाचा नारा !

चिखली : आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने चिखली येथे २३ सप्टेंबर रोजी तालुका सत्ता संपादन मेळावा पार पडला. यामध्ये आगामी निवडणुका ह्या स्वबळावर लढण्याची भूमिका वंचितने स्पष्ट केली.

आगामी जि.प., पं.स. व नगरपालिका निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हाभर सत्तासंपादन मेळावे पार पडत आहेत. याअंतर्गत चिखलीत वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता संपादन मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव होते, तर तालुका निरीक्षक समाधान जाधव, जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, जिल्हा संघटक ॲड. बाळासाहेब राऊत, मालती निकाळजे, विद्याधर गवई, अर्जुन बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीद्वारे स्वबळावर निवडणूक लढून सत्ता संपादन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. यावेळी दिलीप तोडे, हेमचंद्र पाटील, भाई अशोक वानखेडे, रामेश्वर परिहार यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. आयोजन तालुकाध्यक्ष संजय धुरंदर व शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे यांनी केले होते. प्रास्ताविक प्रा. मिलिंद माघाडे, तर आभार प्रवीण खरात यांनी मानले. यावेळी संजय जाधव, महेंद्र हिवाळे, जितू निकाळजे, सिद्धार्थ वानखडे, राहुल गवई, शिवाजी गाडे, संजय सुरडकर, मिलिंद बगाडे, राजेश खंडारे, रवी वाकोडे, गजानन धुरंदर, अशोक वानखडे, रामेश्वर परिहार, बोर्डे मेजर, बी. एल. खरात, उत्तम पवार, गजानन वानखेडे, सागर अथांग, शाहीर ठोबरे, आशा साळवे, छाया जाधव यांच्यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The slogan of self-reliance of the deprived front!