एकाच रात्री सहा दुकाने फोडली!

By Admin | Updated: September 17, 2015 23:52 IST2015-09-17T23:52:31+5:302015-09-17T23:52:31+5:30

मातोळा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांत घबराट पसरली.

Six shops in a single night! | एकाच रात्री सहा दुकाने फोडली!

एकाच रात्री सहा दुकाने फोडली!

मोताळा (जि. बुलडाणा): मोताळा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, रविवारी वॉर्ड क्रमांक १ मधील रामनाथ नाईक यांचे घर फोडल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी मध्यरात्री शहरातील आठवडी बाजार या अतिशय वर्दळीच्या ठिकाणाची सहा दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानाच्या गल्ल्यातील हजारो रुपये लंपास केल्याची घटना १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून, व्यवसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. बुधवारी रात्रीच्या वेळी आठवडी बाजार परिसरातील भाई मंसूर शेठ यांचे किराणा, राधास्वामी किराणा, ङ्म्रीकृपा किराणा, मधुकर मुकुंद पाटील यांचे हार्डवेअर अँन्ड मेडिकल स्टोअर्स या दुकानांचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. बिरारी ज्वेलर्स व विजय जैस्वाल यांचे प्रगती मेडिकलच्या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात केला. चोरीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानातील कोणत्याही साहित्याला हात लावला नसून, फक्त रविराज जयराज सचदेव (रा. मलकापूर) यांच्या राधास्वामी किराणा दुकानातील गल्ल्यातून १३ हजार रुपयाची नाणी चोरून नेल्याची बोराखेडी पोलिसांत नोंद आहे. आठवडी बाजारातील ही सहा दुकाने एकमेकाला लागून असून, राधास्वामी किराणा, भाई अजीज दाऊद किराणा यांच्या दुकांनामध्ये सी.सी. टीव्ही लावलेले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या चोरीदरम्यान या दोन्ही दुकानामधील सी.सी. टीव्हीत चार चोरटे कैद झालेले आहेत. दुकानमालकांना दुकानात चोरी झाल्याचे दुसर्‍या दिवशी लक्षात येताच पोलिसांना माहिती कळविली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेखसह सहकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, चोरीच्या तपासासाठी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या अगोदरसुद्धा यातील दोन दुकानामध्ये चोरी झाली होती, मात्र त्याचा तपास लागलेला नाही.

Web Title: Six shops in a single night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.