शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
2
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
3
धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
4
Saudi vs USA: सौदी अरबने अमेरिकेला दिला ५० वर्षांतील सर्वात मोठा धक्का, प्रकरण काय?
5
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
6
स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी
7
भारत-पाकिस्तान क्रिकेट रद्द करा! उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र
8
सेहवागनं लायकी काढली! पण शाकिबनं स्फोटक खेळी करताच रूबाब दाखवला, म्हणाला...
9
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम! सुपर-८ मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर
10
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
11
"त्यानं भारताविरूद्ध जे केलं ते...", नसीम शाहच्या समर्थनार्थ पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात!
12
'इंडस्ट्रीत एखाद्याच्या मागून....'; सिद्धार्थने सांगितली कलाविश्वातील खटकणारी गोष्ट
13
Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?
14
भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर
15
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
16
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
17
पदवीधरमधील विजय अपप्रचाराचे बारा वाजवेल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
18
भाजीपाल्याचा दुष्काळ: फरसबी, वाटाण्यासह दोडका १६० रुपये किलो, गवार, शेवग्यानेही ओलांडली शंभरी
19
'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला
20
'घरातील काम ही फक्त महिलांची जबाबदारी का?' लोकप्रिय अभिनेत्री सान्या मल्होत्राचा सवाल

खामगावात सहा क्विंटल प्लास्टिकचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:29 PM

खामगाव :  चोरट्या  मार्गाने खामगावात आलेल्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा बुधवारी सकाळी पालिका प्रशासनाने जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  चोरट्या  मार्गाने खामगावात आलेल्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा बुधवारी सकाळी पालिका प्रशासनाने जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील गांधी चौकात ही कारवाई केली.खामगाव शहरात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री चोरी-छुपे विक्री केली जाते. शहरातील काही मोठ्या व्यावसायिकांकडून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा लहान विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येतो. दरम्यान, अकोला येथून एका व्यावसायिकाने कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची मागणी केली. बुधवारी सकाळी अकोला येथून आलेला हा साठा बाळापूर बायपास मार्गे गांधी चौकात आणण्यात येत होता. त्यावेळी काही सफाई कामगारांना हा प्लास्टिक साठा दिसला.  त्यांनी लागलीच मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरोग्य निरिक्षक अनंत निळे, संजय तंबोले, प्रशांत आनंदे आणि सफाई कामगार गांधी चौकात धडकले. त्यांनी एका तीन चाकी गाडीतून जात असलेला हा साठा गांधी चौकात पकडून जप्त केला. तीनचाकी सायकल रिक्षासह सहा क्विंटल प्लास्टिक पिशव्या जप्त!बाळापूर बायपास येथून एका वाहनातून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या उतरविण्यात आल्या. तीन चाकी सायकल रिक्षातून या पिशव्या गांधी चौकात आणण्यात येत होत्या. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकाने या पिशव्या जप्त केल्या. प्रत्येकी ५० किलोचे सहा कट्टे या रिक्षात होते. सायकल रिक्षासह प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. 

 साठाजप्त; व्यावसायिक मोकाट!

जप्त करण्यात आलेला प्लास्टिकचा साठा नेमका कोठे आणि कोणत्या व्यापाºयाकडे जात होता. याची पडताळणी करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला असला तरी, हा साठा नेमका कोणत्या व्यापाºयाचा आणि कोठे जात होता. हे एक कोडेच आहे.

टॅग्स :khamgaonखामगावPlastic banप्लॅस्टिक बंदी