विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 17, 2014 01:00 IST2014-09-17T01:00:24+5:302014-09-17T01:00:24+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील प्रकार; आरोपींना पोलिस कोठडी.

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव जामोद : विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना काल तालुक्यातील पिं पळगाव काळे येथे घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मृतकाच्या माहेरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिंपळगाव काळे येथील अश्विनी विनोद मुंडोकार (वय २१) या विवाहितेने काल घरी कोणी नसताना विष प्राशन केले होते. त्यामुळे तिला उपचारासाठी खामगाव येथील एका खासगी रुग्णालया त उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी सविता अविनाश बावस्कार रा.कुर्हा काकोडा ता.मुक्ताईनगर जि.जळगाव खा. यांनी दिलेल्या फिर्यादीत त्रासाला कंटाळून अश्विनी हिने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली असल्याचे म्हटले होते. फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीं विनोद अर्जुन मुंडोकार, अर्जुन सोनाजी मुंडोकार, सुमनबाई अर्जुन मुंडोकार रा.पिंपळगाव काळे, सुरेखा अशोक मोरे माटरगाव, सुस्मिता काकडे सिरसोली, रमेश तायडे माटरगाव अशा सहा जणांविरुद्ध कलम ४९८, ३0४ (ब), ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी विनोद मुंडोकार व अर्जुन मुंडोकार यांना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणेदार भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राठोड तपास करीत आहेत.