शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सर, तो टिव्हीवरचा धडा लावा ना..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 14:50 IST

एलईडीवरील आॅनलाइन शिक्षणात विद्यार्थी दंग होत असून काही मुले ‘सर, तो टिव्हीवरचा धडा लावा ना!’ असा हट्टच धरतात

 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : टिव्ही किंवा मोबाईल म्हटलं की, विद्यार्थी लगेच आकर्षित होतात. त्यात दृक-श्राव्य माध्यमाचा ‘इफेक्ट’ त्यांच्या मनावर लवकर पडतो; हीच बाब हेरून मुलांना एलईडीवरून आॅनलाइन शिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा परिषद शाळा ऊमरा देशमुख येथे राबविला जात आहे. एलईडीवरील आॅनलाइन शिक्षणातविद्यार्थी दंग होत असून काही मुले ‘सर, तो टिव्हीवरचा धडा लावा ना!’ असा हट्टच धरतात.माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. पारंपरिक शैक्षणिक पद्धतीतील काही त्रुटींचे निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून आॅनलाइन शिक्षणपद्धतीचे एक नवे क्षेत्र उपलब्ध झाले आहे. वेगवेगळ्या वेबसाइटवर विविध अभ्यासक्रम आहेत. या आॅनलाइन अभ्यासक्रमाचा खाजगी शाळाच वापर करत नाहीत; तर जिल्हा परिषद शाळाही यामध्ये अग्रेसर असल्याचे चित्र मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथे पाहावयास मिळते. ऊमरा दे. येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत ग्रामपंचायत व लोकसहभागातून दोन एलईडी संच आहेत. या दोन्ही एलईडीचा वापर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केला जातो. पेन ड्राईव्ह किंवा मोबाईल एलईडीला लाऊन दिवसातून किमान एक तास आॅनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांची अभ्यासातील रूची वाढविण्यास मदत होत आहे.मुलांपेक्षा मुली जास्तकुठल्याही शाळेमध्ये आज मुलांच्या संख्येपेक्षा मुलींच्या संख्या कमीच दिसून येते. परंतू ऊमरा दे. येथील जिल्हा परिषद शाळेत याऊलट चित्र आहे. येथे मुलांची संख्या कमी व मुलींची संख्या अधिक आहे. या शाळेकडून बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेशही वेळोवेळी दिल्या जातो.

कमी जागेत फुलले नंदनवनया शाळेला तशी जागा अत्यंत कमी आहे. परंतू मुख्याध्यापक संजय हिरगुडे व शिक्षक विठ्ठल गावंडे यांनी अत्यंत परिश्रम घेऊन या कमी जागेतच नंदनवन फुलवले आहे. शाळेच्या परिसरात मोगरा, अशोका, मेहंदी यासह विविध प्रकारचे झाडे लावली आहेत. त्यामुळे शाळेचे हे छोटेशे मैदान नेहमी सुशोभित असते.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्या जाते. शाळेसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचेही पूर्ण सहकार्य असते.-संजय हिरगुडे, मुख्याध्यापकशाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे त्यांचा विद्यार्थींची प्रगती चांगली आहे. उत्तम शिक्षण मिळत असल्याने पालक वर्गामध्येही समाधानाचे वातावरण आहे.-संतोष लाटे, पालक

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळा