सिनगाव जहाँगीर उपसरपंचपदी शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:34 IST2021-01-03T04:34:39+5:302021-01-03T04:34:39+5:30

सिनगाव जहाँगीर येथील उपसरपंच रेखा राजेंद्र बंगाळे यांचा कार्यकाळ संपल्याने ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत शेख ...

Singaon Jahangir as Deputy Panchpanch Sheikh | सिनगाव जहाँगीर उपसरपंचपदी शेख

सिनगाव जहाँगीर उपसरपंचपदी शेख

सिनगाव जहाँगीर येथील उपसरपंच रेखा राजेंद्र बंगाळे यांचा कार्यकाळ संपल्याने ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत शेख सलीम शेख ईसा व महादेव रंगनाथ बंगाळे दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. १२ सदस्य असून, यामध्ये दोघांना समसमान सहा मते मिळाली. यावेळी सरपंच लताताई गिते यांनी निर्णायक मत शेख यांच्या पारड्यात टाकल्याने सलीम शेख यांची उपसरपंचपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच लता गिते व सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी एल. एम. पऱ्हाड यांनी काम पाहिले. याप्रसंगी गजानन पवार, प्रकाश गिते, मारुती पाटील, बद्रिनाथ डोईफोडे, सुधाकर मांटे, शेख दिलदार, कृष्णा डोईफोडे, भगवान डोईफोडे, भास्कर बंगाळे, रामदास नागरे, वैभव डोईफोडे, याकूब सेठ, गजानन गिते, गणेश वाघ, निवास डोईफोडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Singaon Jahangir as Deputy Panchpanch Sheikh