शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायतवर भगवा, दरेगावमध्ये राकाँचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:06 AM

 लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित गटाला जबरदस्त धक्का देत शिवसेनेचे शिवाजी लहाने विजयी झाले असून, दरेगाव ग्रामपंचायत राकाँच्या ताब्यात गेली तर वरोडी येथे डॉ. भुजंगराव गारोळे यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.सवडद ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाकरिता चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आजपर्यंत कारखाना आणि बारभाई यांच्यातच लढत होत ...

ठळक मुद्देप्रस्थापित गटाला जबरदस्त धक्का देत शिवसेनेचे शिवाजी लहाने विजयीदरेगाव ग्रामपंचायत राकाँच्या ताब्यातवरोडी येथे डॉ. भुजंगराव गारोळे यांनी एकतर्फी विजय मिळविला

 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित गटाला जबरदस्त धक्का देत शिवसेनेचे शिवाजी लहाने विजयी झाले असून, दरेगाव ग्रामपंचायत राकाँच्या ताब्यात गेली तर वरोडी येथे डॉ. भुजंगराव गारोळे यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.सवडद ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाकरिता चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आजपर्यंत कारखाना आणि बारभाई यांच्यातच लढत होत असे. तेजराव देशमुख यांनी सतत तीन वेळा ग्रामपंचायतमध्ये विजय मिळविला होता. मागील वर्षी दोन्ही गट एकत्र येऊन गाव अविरोध केले होते. यावर्षी मात्र तेजराव देशमुख, रवींद्र देशमुख आणि शिवाजी लहाने अशा तीन विभागात तीन स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणूक लढविली. यात दोन्ही प्रस्थापित पॅनलचा पराभव करून शिवाजी लहाने यांनी विजय मिळविला. लहाने यांना ५७0 तर रावसाहेब देशमुख यांना ५१७ आणि रवींद्र देशमुख यांना ३७३ मते मिळाली. एका नवख्या युवा ब्रिगेडने विजय संपादन केल्याने प्रस्थापित नेत्यांना जबर चपराक बसली आहे. वरोडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव डॉ.भुजंगराव गारोळे यांनी प्रा.सदानंद गुंजकर यांचा पराभव केला आहे, तर मोहाडी येथेही अशोक रिंढे यांनी वसंता इंगळे यांचा पराभव केला आहे. दरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जि.प. सदस्य अरुण वाघ यांच्या गटाच्या ज्योती साबळे विजयी झाल्या असून, त्यांनी नलिनी साबळे यांचा पराभव केला आहे. नसिराबाद ग्रा.पं. सरपंच पदाच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बुद्धू चौधरी यांच्या पत्नी रन्नू चौधरी यांनी विजय संपादन केला. पांग्री उगले ग्रामपंचायतमध्ये सीमा राठोड विजयी झाल्या आहेत, तर तांदूळवाडीमधून छाया बुंधे बिनविरोध झाल्या होत्या.ग्रामपंचायत सदस्य म्हणून सवडद येथे राजू वायसे, सुनीता लहाने, संतोष जाधव, नामदेव काटकर, लीलावती सपकाळ, जयश्री देशमुख, उषा केंधळे, दीपक देशमुख, वर्षा मोरे. वरोडी ग्रामपंचायतमधून हरिभाऊ गुंजकर, वंदना गवई, यमुना वानखेडे, सुनीता गिर्‍हे, एकनाथ गवई, एकनाथ खरात, अनिता गारोळे. मोहाडी ग्रामपंचायतमधून गजानन झगरे, आशा शिराळे, किसन साळवे, विमल काळे, नंदकिशोर रिंढे, जिजाबाई इंगळे, संगीता रिंढे, नसिराबाद ग्रामपंचायतमधून कैलास चव्हाण, कमल गाडेगकर, मीना जाधव, अनिल राठोड, सुरेखा राठोड, समाधान म्हस्के, सुमन राठोड आदी विजयी झाले.

युवकांमध्ये चैतन्यसवडद ग्रामपंचायतमध्ये शिवाजी लहाने गटाचे चार सदस्य, तेजराव देशमुख गटाचे चार आणि रवींद्र देशमुख गटाला फक्त एकाच ठिकाणी विजय मिळाला आहे. शिवाजी लहाने यांनी विजयादशमीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करून युवक वर्गात चैतन्य निर्माण केले होते आणि संपूर्ण गाव या निर्णयाला शिवाजीच्या पाठीशी उभे राहिले होते. त्याची परतफेड मतदारांनी मतदान करून केली. आता सवडद गावात खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे सरकार आरूढ झाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक